शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील ‘त्या’ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी

By admin | Updated: September 30, 2016 00:17 IST

जिल्हा परिषदेच्या अख्त्यारितील विविध विभागांत मेळघाटात प्रतिनियुक्तीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी

प्रतिनियुक्तीचा वाद चिघळला : ३० सप्टेंबरची 'डेडलाईन'अमरावती : जिल्हा परिषदेच्या अख्त्यारितील विविध विभागांत मेळघाटात प्रतिनियुक्तीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी खातेप्रमुखांकडून ३० सप्टेंबरपर्यंत मागविली आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांची लवकरच उचलबांगडी होण्याची चिन्हे आहेत. जि.प.च्या आस्थापनेवरील आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती मागील वर्षी रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता मेळघाट सोडून वर्षानुवर्षे प्रतिनियुक्तीवर इतरत्र ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त रद्द करून त्यांना मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी परत पाठविले जाणार आहे. मेळघाट हा अनुसूचित क्षेत्राचा भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील कामकाज सुव्यवस्थित असणे आवश्यक आहे. शासनही मेळघाटातील अनेक कामांना प्राधान्य देते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि मेळघाटातील रखडलेली कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली आहेत. आधीच मेळघाटात अधिकारी, कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त असल्याने कामात अडथळा निर्माण होतो. परिणामी मेळघाटसाठी दिलेली कामे विहित वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या अख्यारित येणाऱ्या आणि विविध ठिकाणी प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सर्व नियुक्ती रद्द करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व खातेप्रमुखांना अशा कर्मचाऱ्यांचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी ३० सप्टेंबरची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. हा अहवाल प्राप्त होताच प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांची उचलबांगडी अटळ आहे. (प्रतिनिधी)