वरूड : संत्र्याचे कॅरेट रिकामे करीत असताना सायवाडा येथील व्यापाऱ्याचे ट्रकखाली पडलेले १० लाख रुपये कामावरील मजुरांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
प्राप्त माहितीनुसार, सायवाडा येथील संत्रा व्यापारी जुबेर पटेल हे मजुरांकडून ......... वारी फळांचे कॅरेट रिकामे करीत असताना ट्रकमध्येच ठेवलेले दहा लाख रुपये खाली पडले. श्याम किसन उईके आणि फारूख शेख गफ्फार या मजुरांना ती रक्कम सापडली, पण नेमकी ती कुणाची, हे माहीत नव्हते. दुसरीकडे रक्कम गहाळ झाल्याने जुबेर पटेल हे पोलीस ठाण्यात गेले. सहायक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा , सहायक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी , पोलीस शेषराव कोकरे, संदीप वंजारी, प्रफुल लेवलकर यांनी मजुरांना विचारणा केली असता, या दोन्ही मजुरांनी माणुसकीचे दर्शन घडवित ती रक्कम पोलिसांकडे सोपविली. रक्कम मिळताच संत्रा व्यापाऱ्याने सुटकेचा निःश्वास सोडला आणि पोलिसांसह मजुरांचे आभार मानले.