शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटीशकालीन पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडीटचे काम थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 00:17 IST

जिल्हयात लहान- मोठे एकूण ७४४ पूल असून त्यापैकी २७ पूल हे ब्रिटीशकालीन आहेत. यापूलाचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडीट करावे,

जिल्हयात ७४४ लहान-मोठे पुल : प्रशासनाचे दुर्लक्षसंदीप मानकर अमरावतीजिल्हयात लहान- मोठे एकूण ७४४ पूल असून त्यापैकी २७ पूल हे ब्रिटीशकालीन आहेत. यापूलाचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडीट करावे, असे शासनाचे निर्देश असतानाही २७ पूलाचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्यासंदर्भाचे काम थंडबस्त्यात पडले आहेत. महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर प्रशासन जागृत झाले आहे. नुकतेच यासंदर्भात पूणे येथे मागील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यशाळाही पार पडली कार्यशाळेतही पूलाचा स्ट्रक्चरल आॅडीट करुन शासनाला त्वरीत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सेमाडोह येथील सिपना नदीवर पूल नादुरुस्त असल्याचे अधिकाऱ्यांच्या निरीक्षणात पूढे आले आहे. येथे अपघातग्रस्त वळण रस्ता असल्यामुळे वनविभागाची जमीन भुसंपादीत करुन हा वळण रस्त्याचे सरळीकरण करुन पूल बांधण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शासनाला सादर होणार आहे. जिल्हयात ब्रिटीशकालीन लहान १५ तर मोठे १२ पूल आहे. त्यापैकी तीन पूलाचे काम करण्याची तातडीने गरज आहे. ६० ते २०० मीटर पर्यंत उंचीचे हे पूल असल्याची महिती पूढे आली आहे. एका महिन्यात यासंदर्भाचा स्ट्रक्चरल आॅडीटचा अहवाल शासनाकडे सादर करावा लागणार आहे. परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सद्यस्थितीत यासंदर्भाचे कुठलीही नियोजन दिसून आले नाही. त्यामुळे पून्हा पूर परिस्थीती उध्दभवल्यास मोठी हाणी व अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.