फोटो एस-११
बडनेरा : नव्यावस्तीतील मुख्य मार्गावर पाच महिन्यांपासून अर्धवट राहिलेल्या दुभाजकाच्या कामाला लोकमतच्या वृत्तानंतर पूर्ण करण्यात आले. यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला.
संतोषी मातामंदिर ते विश्रामगृहपर्यंतच्या एक किलोमीटर काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल दोन वर्षे लागली. त्यानंतर दुभाजकाच्या कामाला दिवाळीपूर्वी हात लागला. मात्र, पाच महिन्यांपासून सुरू असणाऱ्या या कामातही खूपच दिरंगाई होत असल्याने तसेच अर्धवट कामातील रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आलेल्या दुभाजकाच्या चौकटीमुळे वाहनचालक व शहरवासीयांना धोका निर्माण झाला होता. रेल्वे स्टेशन व नवी वस्तीकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने ‘लोकमत‘ने अर्धवट कामाचे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर प्रशासनाने दुभाजकाचे काम पूर्ण केले. रंगरंगोटी केली जात आहे.
बॉक्स
अजूनही काही काम बाकी
एक किलोमीटर काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी जवळजवळ दोन वर्षे लागली. त्यानंतर चार ते पाच महिने दुभाजक पूर्ण करण्यासाठी इतका वेळ घेतल्यानंतरही रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम शिल्लक आहे. या कामावर शहरवासीयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. प्रमुख मार्ग असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.