विश्रामगृह ते संतोषी माता मंदिरापर्यंतचा एक किलोमीटर काँक्रीट रस्आ पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला तब्बल दोन वर्ष लागले. याच मार्गावरील डिव्हायडरचे काम पाच महिन्यांपासून सुरू आहे. रेल्वे स्थानकाकडे तसेच शहरातून जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने वर्दळ असते. रस्त्याच्या मधोमध कंत्राटदाराने डिव्हायडर उभे करून ठेवले, ते अत्यंत धोक्याचे आहे. संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन डिव्हायडरचे काम तातडीने लवकर पूर्ण करावे, असे शहरवासीयांमधून बोलले जात आहे. रस्त्यावर आणून ठेवलेल्या डिव्हायडरमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
------------------------------------------------------------
बडनेऱ्यात लसीकरणाला उत्तम प्रतिसाद
बडनेरा : शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चार दिवसांत ३०० नागरिकांनी लस टोचून घेतली. यात प्रामुख्याने ज्येष्ठांचा अधिक सहभाग आहे.
बडनेरा शहरात लसीकरणाचे केंद्र दिले नव्हते. अमरावती शहरात जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. नगरसेवक प्रकाश बनसोड यांच्या प्रयत्नाने पाच मार्चपासून येथील मोदी दवाखान्यात लसीकरणाला सुरुवात झाली. त्याला शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणाचे रजिस्ट्रेशन वाढत आहे. आतापर्यंत तीनशे लोकांनी लस टोचून घेतली.