शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नियतीच्या घातावर मेहनतीने केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 21:32 IST

पतीच्या मृत्यूनंतर उघड्यावर आलेल्या संसाराला आपल्या जिद्द व मेहनतीने नवी उभारणी देणाºया तालुक्यातील वसाड येथील सुरेखा हेंबाडे या शेतकरी महिलेच्या यशाला सर्वच सलाम करीत आहेत.

ठळक मुद्देसुरेखा हेंबाडेंचा संघर्ष : पतीच्या मृत्यूनंतर केले स्वप्न साकार, अडीच एकर शेतात अपार परिश्रम

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पतीच्या मृत्यूनंतर उघड्यावर आलेल्या संसाराला आपल्या जिद्द व मेहनतीने नवी उभारणी देणाºया तालुक्यातील वसाड येथील सुरेखा हेंबाडे या शेतकरी महिलेच्या यशाला सर्वच सलाम करीत आहेत.नापिकी व कर्जाने त्रस्त असलेल्या पतीचा नियतीने घात केला. त्याच्या पाठोपाठ आपण ही आयुष्य संपवावा, असे वाटले पण नशिबाने साथ दिली. जिद्द, परिश्रमाला यश आले आहे. मुलाप्रमाणेच शेतातील पिकाची ती जोपासना करीत असून त्यातून भरघोस नफा मिळवीत आहे.धामणगाव रेल्वे तालुक्यातील  वसाड येथील अरुण हेंबाडे या शेतकºयाने नापिकी, सावकाराचे कर्ज, बँकेचा वसुलीचा तगादा यामुळे विष प्राषन करून आत्महत्या केली. संसाराचा विचार न करता पतीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने अरुणची पत्नी, दोन मुले उघड्यावर आली. जीवन संघर्ष अर्ध्यावर न सोडता सुरेखाने खडतर लढा दिला.नियतीशी दोन हात करण्याचा निर्णय घेऊन तीने आपला जीवन लढा कायम ठेवण्याची जिद्द ठेवली. घरातील दोन एकर शेतीत राबणे सुरू केले. कुणाच्याही मदतीची वाट न पाहता मुलगा आशिष व अविनाश  यांनी शिक्षणासह आईला शेतकामात मदत सुरूकेली, गावकºयांनी सुद्धा  तिचा परिस्थितीशी संघर्ष पाहून तिला मदत करण्याचे ठरविले. मात्र सुरेखाने ती मदत स्वीकारली नाही. कधीकाळी तिने दुसºयाच्या शेतात मजुरी करून दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांचे उज्ज्वल भविष्य हेच तिच्या जीवनाचे धेय ठरले आहे.पतिवियोगाचे दु:ख तर सुरेखाला  आहेच. मात्र, रडत बसायचे सोडून तिने कामासाठी पदर खोचला आहे. यावर्षी सुरेखाने  आपल्या अडीच  एकर शेतात सोयाबीन पेरले असून यावर्षीसुद्धा तिला मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तिचे दोन मुले सतत तिच्यासोबत असतात  अभ्यासासोबत आईला शेतीच्या कामात तिला मदत करतात.