शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठ उड्डाणपुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:39 IST

राजापेठ उड्डाणपुलाचे बांधकाम दोन महिन्यांपासून रेल्वे विभागाच्या हलगर्जीपणामुळे रखडले आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देरेल्वे विभागाचा हलगर्जीपणा : बडनेरा मार्ग गाठण्यासाठी नागरिकांना फेरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ उड्डाणपुलाचे बांधकाम दोन महिन्यांपासून रेल्वे विभागाच्या हलगर्जीपणामुळे रखडले आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.महापालिकेच्या अखत्यारीतील राजापेठ उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले. परंत,ु रेल्वे रुळावरील काम केवळ पिल्लरवरच थांबले आहे. चार हजार कोटी रुपयांच्या या उड्डाणपुलाचे कंत्राट नागपूर येथील कंत्राटदाराला दिले आहे. २४ महिन्यांत सदर काम पूर्ण करण्याचे बंधनकारक होते. मात्र, अद्याप वर्षभर पुरेल एवढे काम शिल्लक आहे. रेल्वे रुळाखालून अंडरपास करण्यासाठी सिमेंटचे ४४ ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. राजापेठ बाजूला तीन पिल्लर आणि रुळाच्या पलीकडे ३ पिल्लर अशा ६ पिल्लरच्या मधातील परिसर रेल्वे विभागाच्या मालकीचा आहे. कंवरनगरकडे जाणारा उड्डाणपूल पूर्णत: तयार झाला असून, त्यावर पथदिवे लावण्यासाठी १४ लोखंडी खांब लावण्यात आलेले आहेत. उड्डाणपुलावर प्रचंड वजनाचे रोड रोलर उभे असताना त्यावरच लोखंडी पाण्याची टाकी उभी केली जात आहे.दीड वर्षांपूर्वी सुरू झालेले हे काम अजूनही वर्षभर पुरणार आहे. संथगतीने काम होत असल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. राजापेठ येथून विविध कॉलनी, नगरात जाण्यास सोयीचे जात असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ राहते. त्यामुळे नागरिकांना नवाथेनगरातून फेऱ्याने ये-जा करावी लागत आहे.रुळाच्या खालून बॉक्स टाकण्याचे काम सुरू होईल. त्याकरिता चार तास रेल्वे वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. डिसेंबरअखेर उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास जाईल.- सुनील वासेकर, सेक्शन इंजिनीअर, रेल्वे विभाग बडनेराराजापेठ येथे रेल्वे रुळाखालील अंडरपाससाठी निर्माण केलेल्या सिमेंटच्या बॉक्समुळे जागा व्यापली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम तूर्तास बंद आहे.- सुहास चव्हाण, उपअभियंता बांधकाम विभागमहापालिका

टॅग्स :Amravatiअमरावती