शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

कामापूर्वीच कंत्राटदाराला देयक प्राप्त

By admin | Updated: March 14, 2015 00:43 IST

स्थानिक नगरपरिषदेंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या निकृष्ट बांधकामाची तक्रार तीन नगरसेवकांसह ३९ नागरिकांनी केल्यानंतरही प्रशासनाने याची दखल घेतली नाही.

सुरेश सवळे  चांदूरबाजारस्थानिक नगरपरिषदेंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या निकृष्ट बांधकामाची तक्रार तीन नगरसेवकांसह ३९ नागरिकांनी केल्यानंतरही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. शिवाय कंत्राटदाराच्या दबावाखाली येऊन डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच कंत्राटदाराला या कामाची ३२ लक्ष ९२ हजार ६७ रुपयांची रक्कम अदा केली. या निकृष्ट रस्त्याचे डांबर ठिकठिकाणी उखडले असून रस्त्यावर नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिक्षण सभापती गोपाल तिरमारे व काँग्रेसचे नगरसेवक एजाज अली मुशरफअली यांनी करुन चौकशीची मागणी केली आहे. २८ मार्चनंतर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी आ. बच्चू कडू, जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून वॉर्ड क्र. २ मधील डॉ. आंबेडकर बालोद्यानापासून गाडगेबाबा मंदिरापर्यंत व पुढे जुना कोंडवाड्यापर्यंत डांबरीकरणाचे कामाला मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांनी तांत्रिक मंजुरी प्राप्त केली. या कामाच्या ई-निविदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्यानंतर या कामाचे कंत्राट मोर्शीच्या कंत्राटदाराला देण्यात आला. हे काम अंदाजपत्रक दराच्या ८.९७ टक्के अधिक दराने देण्यात आले, हे विशेष! या कामाची एकूण अंदाजित किंमत ३४ लक्ष १८ हजार ७४० असून यात १३ लक्ष ५५ हजार ९२० रुपयांच्या रनिंग बिलाची रक्कम कंत्राटदाराला १ आॅक्टोबर २०१४ रोजी प्रदान करण्यात आली. या कामाचे दुसरे रनिंग बिल ३० लक्ष २१ हजार ७७ चे तयार करण्यात आले होते. मात्र सदर काम अंदाजपत्रक दराने ८.९० टक्के अधिक दराने देण्यात आल्यामुळे कंत्राटदाराला २ लक्ष ७० हजार ९९० रुपये अतिरिक्त देण्यात आले. करांची रक्कम कपात करुन पालिका प्रशासनाने कंत्राटदाराला १६ लक्ष ३९ हजार ९१८ रुपये काम पूर्ण होण्याआधीच (२२ डिसेंबर २०१४) देण्यात आले. बांधकाम अभियंत्याने लेखापाल अंतर्गत लेखा परीक्षक, विभागप्रमुखांच्या माध्यमातून एम.बी. रेकॉर्ड तयार करुन देयक प्रदान करताना सादर करावयाचे विवरणपत्र व इतर दस्तऐवजदेखील त्याच दिवशी तयार केले. १६ लक्ष ३९ हजार ९१८ रुपयांचा धनादेश कंत्राटदाराला रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच प्रदान केला, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. काम सुरू असतानाच २४ डिसेंबर २०१४ रोजी परिसरातील २९ नगरसेवकांनी निकृष्ट कामबंद करण्याची तक्रार मुख्याधिकारी व तहसीलदारांकडे केली होती. नगरसेविका लविना आकोटकर यांनीही तक्रार केली.