शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लोणी-आलोडा मार्गाचे काम अर्धवट स्थितीत

By admin | Updated: November 24, 2015 00:25 IST

लोणी ते आलोडा हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा फज्जा : काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे उपोषण लोणी : लोणी ते आलोडा हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे काम गतवर्षी डिसेंबर महिन्यात सुरू केले होते. परंतु ठेकेदाराने अर्धवट काम करून काम बंद केले. पाऊणेआठ किमी लांबीच्या रस्त्यासाठी ३ कोटी ५३ लाख १५ हजार रुपये किंमतीचा रस्ता वाऱ्यावर सोडल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. केंद्र सरकारच्या निधीतून बांधकाम होत असलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.लोणी आलोडा नांदगाव हा ७ किमी ८०० मीटरचा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात येऊन या रस्त्यासाठी ३ कोटी ५३ लाख १५ हजार रुपये अर्थसहायक मंजूर आहे. सदर रस्त्याचे काम २०१४ च्या डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आले होते. रस्ता तयार करण्याकरिता रुंदीकरणासह रस्त्यावर येणाऱ्या पुलांचे बांधकाम सुरू केले. यासाठी जुना रस्ता काढण्यात आला. सदर रस्त्यावर पावसाळ्यात शेतकरी, विद्याथी तसेच नगारकीांना मोठा त्रज्ञस सहन करावा लागला होता. यावेळी नगारकीांनी ओरड केली असता बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. याबाबत पालकमंत्री, खासदार तसेच आमदारांनासुध्दा नागरिकांनी वेळोवेळी माहिती तसेच तक्रारी दिल्या. परंतु कोणीही दखल घेतली नाही. पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याचे काम सुरूच झाले नाही. मात्र रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकासह नागरिकांना मरणयातना सोसण्याची वेळ आली आहे. अखेर भाजपाचे कार्यकर्ते मनोहर दाभाडे, अरविंद कोकाटे यांनी अखेर लोणी आलोडा रस्त्यावरच शनिवारपासून सुरू करण्यात आले. विद्यार्थीव शेतकरी-शेतमजुरांना मोठा त्रास होत आहे. पुलासह रस्त्याचे अर्धवट बांधकाम डोकेदुखी ठरत आहे. सदर उपोषणाला प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता वि.शा.जवंजाळ यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांना निधी आल्यावर तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र लेखी पत्रामध्ये सदर योजनेच्या रस्त्याचे काम ८५ लाख रुपयांचे झाले असून ठेकेदाराला केवळ १६ लाख रुपये अदा करण्यात आल्याचे सांगितले असून उर्वरित ६९ लाख रुपये देयेक प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. गत मे महिन्यापासून काम बंद केल्याचेसुध्दा लेखी पत्र दिले. सदर कामाचा निधी उपलब्ध करण्याकरिता पाठपुरावा सुरू असून निधी उपलब्ध होताच तातडीने काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी प्राप्त झाला नसल्याने या योजनेचा फज्जा उडत आहे, तर नागरिकांना असहय मरणयातना सोसाव्या लागत आहे. यामुळे तातडीने रस्त्याचे काम सुरू करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे. भाजपाचे आलोडा शाखाप्रमुख मनोहर दाभाडे तसेच संघटक अरविंद कोकाटे यांनी सरकारच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करून घरचा अहेर दिला आहे. (वार्ताहर)