शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांच्या उद्बोधनाने रा. स्व. संघ विदर्भ प्रांत शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:41 IST

अमरावती शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिराचा समारोप रविवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उद्बोधनाने झाला. त्यानंतर शिबिरार्थी नव्या जोषाने परतीच्या प्रवासासाठी रवाना झाले.

ठळक मुद्देसुरक्षा यंत्रणेने घेतला सुटकेचा श्वास : नव्या उमेदीने शिबिरार्थी रवाना, राष्ट्रभक्त ीचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अमरावती शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिराचा समारोप रविवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उद्बोधनाने झाला. त्यानंतर शिबिरार्थी नव्या जोषाने परतीच्या प्रवासासाठी रवाना झाले.अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलानजीक १८ ते २० जानेवारी या तीन दिवसांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले. या शिबिराची संपूर्ण जबाबदारी रा. स्व. संघ अमरावती महानगराकडे होती. रविवारी या शिबिराचा समारोप सरसंघचालकांच्या पाऊण तास झालेल्या उद्बोधनाने झाला. दुपारी साडेबारा वाजता शिबिराचे शेवटचे सत्र आटोपले. त्यानंतर शिबिरार्थिींचा भोजनाचा कार्यक्रमा झाला.शिबिर स्थळी मुक्तागिरी नगरात सरसंघचालकांनी शिबिरार्थिंसोबत भोजन केले. त्यानंतर दुपारी ४ वाजता सरसंघचालक नागपूरकडे रवाना झालेत. शिबिराचा समारोप झाल्यानंतर विदर्भातून आलेल्या प्रवासी कार्यकर्त्यांचा लोंढा परतीच्या प्रवासासाठी शिबिरस्थळाहून बाहेर पडत होता. सरसंघचालक तीनही दिवस मुक्कामी असल्याने सुरक्षा यंत्रणा रात्रंदिवस तळ ठोकून होती. त्यांनीदेखील सुटकेचा श्वास घेतला. मकरसंक्रांतीच्या पर्वावर शिबिर असल्याने प्रत्येक शिबिरार्थिंना तीळगुळाचे वाटप करण्यात आले. संघाच्या विविध कार्यक्षेत्राची माहिती असणाऱ्या प्रदर्शनीला व शिबिरस्थळाला पाहण्यासाठी अमरावती जिल्ह्यासह दूरदुरून लोक याठिकाणी आले होते.खासदारालादेखील थांबावे लागलेशिबिर स्थळाला भेट देण्यासाठी गडचिरोलीचे भाजपचे खासदार अशोक नेते यांना सरसंघचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या प्रवेशद्वारावर थांबावे लागले. संघाचे प्रमुख पदाधिकारी त्याठिकाणी आल्यानंतरच त्यांना आत जाता आले. त्यांच्या सुरक्षा रक्षक व सोबत्यांनादेखील प्रवेश मिळाला नव्हता. एकूणच शिबिरस्थळी स्वयंसेवकांनी त्याचबरोबर पोलीस यंत्रणादेखील चोख बंदोबस्तात तैनात करण्यात आली होती.भाजप खासदार, आमदारांची शिबिर स्थळाला भेटीपाच हजार प्रवासी कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीतील विदर्भ प्रांत शिबिरस्थळाला महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच खासदार व आमदारांनी भेटी दिल्यात. तीनही दिवस विविध भागातले मान्यवर देखिल येथे येवून गेलेत.