शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खापर्डेवाड्याला ‘श्रीं’चा पदस्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:21 IST

श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या हयातीत राजकमल चौकातील खापर्डेवाड्याला शेगाव निवासी राजाधिराज योगिराज संत गजानन महाराज यांनी भेट दिली होती. येथे काही वेळ त्यांनी विश्रांती घेतली होती. श्रींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या वाड्यात प्रकटदिनानिमित्त सोमवारी महाआरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम भक्तांनी आयोजित केला आहे.

ठळक मुद्देआज प्रकटदिन : महाआरती, प्रसाद वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या हयातीत राजकमल चौकातील खापर्डेवाड्याला शेगाव निवासी राजाधिराज योगिराज संत गजानन महाराज यांनी भेट दिली होती. येथे काही वेळ त्यांनी विश्रांती घेतली होती. श्रींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या वाड्यात प्रकटदिनानिमित्त सोमवारी महाआरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम भक्तांनी आयोजित केला आहे.दासगणू महाराजांच्या ‘श्री गजानन विजयग्रंथ’मध्ये संत गजानन महाराजांच्या खापर्डेवाड्यातील वास्तव्याचा उल्लेख आढळून येतो. या वाड्यात एक विहीर असून, विहिरीच्या बाजूला एक चौथरा आहे. तेथे पूर्वी एक औंदुबर वृक्षसुद्धा होते. या झाडाखाली संत गजानन महाराज बसले होेते, असे जुने जाणते भाविक सांगतात. पण, सदर वृक्ष तोडण्यात आले. सदर वाडा श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या वंशजांनी काही वर्षांपूर्वी एका बिल्डरला विकल्याची माहिती आहे. त्यामुळे इतिहास व अध्यात्माचा संगम असूनही या ठिकाणी कुठलाही विकास झाला नाही. या एतिहासिक वाड्याचे महापालिकेने संवर्धन करावे, अशी मागणी भाविकांची कायम आहे. त्यासंदर्भातील फाईल मंत्रालयात धूळखात पडली आहे. या वाड्यात श्री संत गजानन महाराजांचे मंदिर व्हावे, असेही भाविकांना वाटते. दरवर्षी प्रकटदिनाला ‘श्रीं’ची आरती व पूजा केली जाते. या कार्यक्रमाला शेकडो भाविकांची उपस्थिती लाभते.तो चौरंग पेटकरांच्या निवासस्थानीदादासाहेब खापर्डे यांनी संत गजानन महाराज यांचे पूजन केले. यावेळी ते ज्या चौरंगावर बसले होते, तो चौरंग अद्यापही सुस्थितीत आहे. रविकिरण सोसायटीतील रहिवासी डॉ. आनंदराव पेटकर यांना खापर्डे कुटुंबीयांनी तो भेट दिला होता. प्रकटदिनाला त्या चौरंगाचीही पूजा केली जाते.