शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिलांची ‘वीरूगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 00:12 IST

न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूचे दुकान बंद केल्याने तालुक्यातील व तिवसा शहरातील दारूची दुकाने बंद झाली होती.

अखेर पाच दिवसांसाठी दुकान बंद : तळेगावात पोलिसांसोबत झटापट लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूचे दुकान बंद केल्याने तालुक्यातील व तिवसा शहरातील दारूची दुकाने बंद झाली होती. त्यामुळे तिवसा तालुक्यातील एकमात्र तळेगाव ठाकूर येथील देशी दारू दुकानाकडे तळीरामांनी मोर्चा वळविला होता. या दुकानामुळे तळेगाव ठाकूर येथील अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने याविरोधात महिलांनी एल्गार पुकारला आहे. याअनुषंगाने शुक्रवारी ९ जून रोजी गावातील देशी दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी गावातील हजारो महिलांनी एकत्र येऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’स्टाईल आंदोलन केले. दरम्यान दंगा नियंत्रण पथक व तिवसा पोलिसांनी महिलांना पाण्याच्या टाकीवर चढण्यास मज्जाव केला. पाण्याच्या टाकीजवळ आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी अडवून ठेवले होते. यावेळी महिला व पोलिसांमध्ये झटापट देखील झाली. अखेर दुपारी २ वाजता तिवसा येथील तहसीलदारांनी तात्पुरत्या स्वरूपात शुक्रवारपासून पाच दिवस देशी दारूचे हे दुकान बंद करण्याचे आदेश देत दुकानाला कुलूप ठोकले. मात्र, सहाव्या दिवशी हे दुकान सुरू झाल्यास कोणतेही आंदोलन न करता हे दुकान थेट पेटवून देण्याचा इशारा महिला आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे. १० हजार लोकवस्तीच्या तळेगाव ठाकूर येथील शासनमान्य परवानाधारक या देशी दारू दुकानात बाहेरील नागरिक दारू पिण्यास येत असल्याने गावातील शांततेला बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांनी अनेकदा दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी निवेदने दिलीत. मात्र, कारवाई झाली नाही. त्यामुळे ठरल्यानुसार महिलांनी शुक्रवारी सकाळपासून गावातील हजारो महिलांनी नारेबाजी करीत गावातून रॅली काढली व ११.३० वाजता हजारो महिला-पुरूष पाण्याच्या टाकीवर चढण्यासाठी आल्यात. मात्र पोलिसांनी त्यांना गेटवरच अडून ठेवले. त्यामुळे पोलीस व महिलांमध्ये चांगलीच झटापट झाली. मात्र, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.