शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महिला एस.टी. चालकांची निवड प्रक्रिया अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:07 IST

अमरावती : राज्य परिवहन महामंडळातर्फे गतवर्षी जानेवारी महिन्यात राबविलेल्या महिला चालक-वाहक भरती प्रक्रियेत १८ महिला पात्र ठरल्या होत्या. मात्र, ...

अमरावती : राज्य परिवहन महामंडळातर्फे गतवर्षी जानेवारी महिन्यात राबविलेल्या महिला चालक-वाहक भरती प्रक्रियेत १८ महिला पात्र ठरल्या होत्या. मात्र, महिला उमेदवारांचे प्रशिक्षण कोरोनामुळे अर्ध्यावरच स्थगित केल्याने त्या काही महिन्यांपासून घरीच आहेत. अखेर सोमवारी संध्याकाळी प्रशिक्षणावर स्थगिती उठवण्यात आल्याने उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्य परिवहन महामंडळातर्फे २०१९ मध्ये राज्य भरती महिला व पुरुषांसाठी चालक - वाहक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात अमरावती विभागातून महिला चालक-वाहकपदासाठी ५५ आलेल्या अर्जांपैकी १८ महिला अंतिम निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या होत्या. अंतिम निवड प्रक्रियेतून पात्र ठरलेल्या या महिलांना औरंगाबाद येथे प्रशिक्षणासाठी पाठविले होते, तर काही महिलांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येत होते. प्रशिक्षण सुरू असतानाच महामंडळातर्फे कोरोनामुळे महिलांचे प्रशिक्षण अर्ध्यावर स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आता पुन्हा प्रशिक्षण देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

बॉक्स

जिल्ह्यातील आगार ८

बस चालक ८०४

बस वाहक ८६९

महिला चालक ००

बॉक्स

जिल्ह्यातून १८ महिला चालकांची निवड

महामंडळातर्फे जिल्हानिहाय ही भरती प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले होते. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी कागदपत्रांची तपासणी शैक्षणिक अहर्ता आदी बाबी तपासून १८ महिलांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या महिलांमध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिलांचा समावेश या महिला घरी थांबून आहेत. मंडळात तर्फे लवकरात लवकर सेवेत घेण्यासाठीची प्रतीक्षा पात्र असलेल्या महिला वर्गाला लागून आहे.

कोट

राज्य परिवहन महामंडळाने कोरोनामुळे आमचे प्रशिक्षण थांबवले होते. यावेळी आम्ही घरीच बसून होतो. मात्र आता प्रशिक्षणावरील स्थगिती उठविल्याने पुन्हा रुजू होण्याची संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

- प्रिया काळे,

प्रशिक्षणार्थी महिला

कोट

एसटी महामंडळात चालक कम वाहक म्हणून रुजू होणार म्हणून खुप आनंदा झाला. परंतु कोरोनामुळे महामंडळाने आमच्या प्रशिक्षणाला स्थगिती दिली होती. त्यामुळे आता पुन्हा प्रशिक्षण सुरू होऊन सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे.

- प्रिया उमेकर, प्रशिक्षणार्थी महिला

कोट

कोरोनामुळे पुरुषांप्रमाणे महिला चालक-वाहकांच्या प्रशिक्षणालाही महामंडळाने स्थगिती दिली होती. ती आता उठविण्यात आली आहे. महामंडळाकडून या उमेदवारांची सेवा पूर्ववत सुरू करण्याचे आदेश आल्यानंतर या उमेदवारांना वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे सेवेत घेण्यात येईल.

- श्रीकांत गभने,

विभाग नियंत्रक