शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"महिला कुस्तीपटूंवरील अत्याचार देशाच्या संस्कृतीसाठी कलंक", अमरावतीतील संघटनांचा सूर

By उज्वल भालेकर | Updated: May 9, 2023 19:01 IST

कुस्ती खेळाडूंच्या समर्थनार्थ अमरावतीतही मंगळवारी धरणे; सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा संघटनांचा सहभाग

उज्वल भालेकर, अमरावती: महिला कुस्ती खेळांडूचे लैंगिक शोषण व अत्याचार विरोधात मागील १५ दिवसांपासून राजधानी नवी दिल्ली येथील जंतरमंतरवर कुस्तीपुटूंचे आंदोलन सुरु आहे. खेळांडूवरील अत्याचार हे भारतीय संस्कृतीसाठी कलंक असल्याचे सांगत, शहरातील विविध सामाजिक संघटना व खेळांडूनी एकत्र येत खेळाडूंच्या समर्थनामध्ये मंगळवारी शहरातील डॉ. आंबेडकर चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळांडूनी लैंगिक शोषणाचे आरोप केेल्याने देशभरातून या प्रकरणात राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रीया उमटत आहेत. बृजभूषण यांना अटक व्हावी यासाठी देशाची शान उंचावणारे कुस्तीपटू जंतरमंतर वर २३ एप्रिलपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनदरम्यान पोलीसांकडून कस्तीपटूंना मारहाणही झाल्याचे आरोप आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून भारताचे भूषण ठरलेल्या महिला खेळाडूंवर जर लैंगिक अत्याचार होत असतील तर जगात आपल्या देशाची अप्रतिष्ठा करणारी ही गंभीर व संतापजनकबाब असल्याचे एकदिवसय धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांचे म्हणने आहे.

त्यामुळे अन्याय-अत्याचारा विरोधात लढा देत असलेल्या महिला कुस्तीपटूंसोबत उभे राहणे हे भारत देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. त्यामुळे कुस्तीपटूच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अमरावती मधील क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, महिला संघटना, खेळाडू तसेच सर्व संवेदनशील नागरिकांनी एकदिवसीय धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी प्रा अंबादास मोहिते, कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई बोंडे, किशोर बोरकर, मधुकर अभ्यंकर, जगदिश गोवर्धन, माजी नगरसेवक भूषण बनसोड, कॉँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष अंजली ठाकरे सह इतर शहरातील राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

टॅग्स :AmravatiअमरावतीWrestlingकुस्ती