शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानापुढे महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 21:52 IST

येथील दलितवस्तीतील देशी दारूच्या दुकानाकरिता आलेला माल दुकान उघडून आत ठेवण्याचा मनसुबा स्त्रियांनी उधळून लावला. त्यांनी रात्रभर ठिय्या देत दुकान उघडण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे संपूर्ण दारूमुक्तीचा रिद्धपूर येथील महिलांचा निर्धार प्रकट झाला आहे.

ठळक मुद्देरात्र काढली जागून : दुकान उघडण्यास केला प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्करिद्धपूर : येथील दलितवस्तीतील देशी दारूच्या दुकानाकरिता आलेला माल दुकान उघडून आत ठेवण्याचा मनसुबा स्त्रियांनी उधळून लावला. त्यांनी रात्रभर ठिय्या देत दुकान उघडण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे संपूर्ण दारूमुक्तीचा रिद्धपूर येथील महिलांचा निर्धार प्रकट झाला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ३१ मार्च २०१७ पासून रिद्धपूर येथील दलितवस्तीतील देशी दारूचे दुकान बंद आहे. यामुळे येथील नागरिकांना मद्यपींचा त्रास पूर्णत: बंद झाला. तथापि, देशी दारूच्या दुकानाच्या मालकाने परवान्याचे नूतनीकरण केल्यानंतर ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पिकअप वाहनात देशी दारूच्या पेट्या दुकानामध्ये विक्री करण्याकरिता आणल्या होत्या. त्याची चाहूल लागताच परिसरातील महिलांनी मद्यविक्री दुकानाच्या गेटवर ठिय्या दिला. त्यामुळे मद्यविक्रेत्याला पेट्या आत नेता आल्या नाही वा दुकानही उघडता आले नाही. त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, शनिवारी वृत्त लिहिस्तोवर महिला येथून हटल्या नव्हत्या. ठाणेदारांनी सायंकाळी गावाला भेट दिली. सदर दुकान तीन न उघडण्याचे फर्मान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बजावले.दुकान न्यावे गावाबाहेरदेशी दारू दुकानाबाबत १ मे २०१७ रोजीच्या ग्रामसभेमध्ये देशी दारूचे दुकान कायमचे बंद करण्याचा ठराव घेतलेला आहे. तथापि, हे दुकान गावाबाहेर स्थलांतरित करावे, असे या महिलांनी सांगितले.श्रीक्षेत्र रिद्धपूर हे ‘ब’ दर्जाप्राप्त गाव आहे. देशी दारूचे दुकान मध्यवस्तीत आहे. ते गावाबाहेर स्थलांतरित केले, तर येथील नागरिकांच्या सोईचे होईल.- गोपाल जामठे, सरपंच