शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करून महिला पोलिसावर हल्ला

By admin | Updated: September 19, 2016 00:13 IST

बसस्थानक परिसरात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या महिला पोलिसाचा विनयभंग करून हल्ला करण्यात आला.

बस स्थानकाजवळील घटना : दोन आरोपींना अटकअमरावती : बसस्थानक परिसरात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या महिला पोलिसाचा विनयभंग करून हल्ला करण्यात आला. ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी शनिवारी रतन वसंत उके (३६,रा. राजमातानगर) व अण्णा देशमुख नावाच्या इसमाला अटक केली आहे. महिला पोलीस व पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय (बं.न. १२४६) हे १६ सप्टेंबर रोजी गणपती बंदोबस्तानिमित्त बसस्थानकावर वाहतूक नियंत्रित करीत होते. दरम्यान आरोपीने महिला पोलिसाचा असभ्य भाषेत बोलून विनयभंग केला. याबद्दल महिला पोलीसाने आरोपींना जाब विचारला असता आरोपींनी त्यांना अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच मारण्यास अंगावर धावून गेले आणि त्यांचा गळा पकडून हॉटेलच्या भट्टीवर ढकलून दिले. या हल्ल्यात महिला पोलिसाच्या उजव्या हाताला व पायाला मूका मार लागला. आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण करून महिला पोलिसाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केल्याने पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. या घटनेची तक्रार शनिवारी महिला पोलिसाने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध भादंविच्या कलम ३५४, ३५३, २९४, ३३२, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.बी. गायकवाड करीत आहे. तीन दिवसांत दोनदा पोलिसांवर हल्लेशहरावासियांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर मागील तीन दिवसांत दोनदा हल्ले झालेत. १५ सप्टेंबर रोजी दामिनी पथकातील महिला पोलिसावर दोघांनी हल्ला चढविला होता. आता तीन दिवसांत ही दुसरी घटना घडली आहे.