शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकान उघडण्याचा डाव महिलांनी उधळला

By admin | Updated: May 9, 2017 00:15 IST

राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील दारूविक्रीची दुकाने बंद करण्यात आल्यानंतर शिल्लक राहिलेल्या शहरातील २ दारूविक्री दुकानांवर मद्यपींची गर्दी वाढली आहे.

वरूडमध्ये महिला आक्रमक : दारू दुकानापुढे दिला ठिय्या लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील दारूविक्रीची दुकाने बंद करण्यात आल्यानंतर शिल्लक राहिलेल्या शहरातील २ दारूविक्री दुकानांवर मद्यपींची गर्दी वाढली आहे. त्यामुळे महिला, मुलींना त्रास वाढला होता. त्यामुळे १० दिवसांपूर्वी ही दोन्ही दारू दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन यशस्वी झाल्याने या दुकानांना सील लावण्यात आले होते. मात्र, सोमवारी या दोन्ही दुकानांचे सील तोडून ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. ही बाब लक्षात येताच रविवार दुपारपासून पुन्हा महिलांनी दारू दुकानासमोर ठिय्या देत दुकान उघडण्याचा डाव उधळला. महामार्गावरील मद्यविक्रीची दुकाने बंद झाल्याने शहरातील २ देशी दारूच्या दुकानांमध्ये ग्राहकांची तुंबळ गर्दी उसळत होती. येथे वादविवादही वाढले होते. यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे विशेषत: महिलांचे व मुलींचे जीवन असुरक्षित व धोकादायक झालेले होते. या दुकानांमुळे परिसरातील लोकांना त्रास असह्य झालेला होता. यामुळे महिलांनी पुढाकार घेऊन दोन्ही देशी दारू दुकानांसमोर दारूमुक्ती जनसत्याग्रह आंदोलन केले होते. आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणून या दोन्ही दुकानांना सील ठोकण्यात आले होते. यापुढे ही दोन्ही दुकाने उघडली गेल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. परंतु दोन दिवसांपूर्वी या दोन्ही दुकानमालकांनी स्वत:च सील तोडले आणि पुन्हा दुकान सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु परिसरातील महिलांनी व युवकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. आ. अनिल बोंडे व वसुधा बोंडे यांनीदेखील घटनास्थळी पोहोचून आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात पंचायत समिती सदस्या अर्चना तुमराम, पालिका उपाध्यक्ष किशोर भगत, गटनेता व नगरसेवक नरेंद्र बेलसरे, हरीश कानुगो, मनोज गुल्हाने, राजू सुपले, योगेश चौधरी, देवेंद्र बोडखे, नगरसेविका नलिनी रक्षे, पुष्पा धकिते, रेर्खा काळे, मंदा आगरकर, शुभांगी खासबागे, छाया दुर्गे, सुवर्र्णा तुमराम, अर्चना आजनकर, भारती माळोदे, स्वीकृत सदस्य संतोष निमगरे, प्रितम अब्रुक, युवराज आंडे, भारत खासबागे, सुरेश दुर्गे, सागर मालपे, राजेंद्र काळे, प्रकाश माळोदे, संजय आगरकर, हारून शहा, प्रभाकर दौड, राहुल पाटील आदींचा सहभाग होता.