शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील महिला असुरक्षितच; उत्तर प्रदेशनंतर दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 16:03 IST

महिलांविषयक गुन्ह्यात झालेली वाढ राज्यातील महिलाशक्ती असुरक्षित असल्याचेच अधोरेखित करणारी आहे. २०१५-१६ व २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये अशा गुन्ह्यांमध्ये ८२५ ने वाढ झाली आहे.

ठळक मुद्देगुन्ह्यांमध्ये वाढ

प्रदीप भाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिलांविषयक गुन्ह्यात झालेली वाढ राज्यातील महिलाशक्ती असुरक्षित असल्याचेच अधोरेखित करणारी आहे. २०१५-१६ व २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये अशा गुन्ह्यांमध्ये ८२५ ने वाढ झाली आहे. राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या २०१७-१८ च्या आर्थिक पाहणी अहवालाच्या निमित्ताने ही बाब उघड झाली आहे.पुरोगामी महाराष्ट्रात महिलाविषयक गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी कडक कायदे आहेत. दिल्लीच्या निर्भया हत्याकांडानंतर तर कायद्यात सुधारणा करून गुन्हेगारांना अधिकाधिक शिक्षा मिळवून देण्यासाठी शासनाने पाऊल उचलले. तरीही कोपर्डी बलात्कारासारखी अश्लाघ्य घटना उघडकीस आलीच. त्यानंतर महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये घट अपेक्षित असताना गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे.बलात्कार, अपहरण, विनयभंग, लैंगिक अत्याचार, अनैतिक व्यापारासह हुंडाबळी, पती व नातेवाइकांकडून झालेली क्रूर कृत्ये याप्रकरणी २०१५ साली ३१ हजार १२६ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात २०१६ मध्ये वाढ होऊन ती संख्या ३१ हजार २७५ वर स्थिरावली, तर २०१७ मध्ये ३२ हजार १०० गुन्हे नोंदविण्यात आलेत. २०१७ मध्ये २३४ महिला हुंडाबळी ठरल्या. त्यामुळे २०१६ मध्ये २४८, तर २०१५ मध्ये २६८ महिला हुंडाबळी ठरल्याची नोंद आहे. २०१७ मध्ये बलात्काराची ४,३५६ प्रकरणे नोंदविण्यात आली. २०१६ मध्ये तो आकडा ६१६९ होता. २०१७ मध्ये १२ हजार २३४, २०१६ मध्ये ११ हजार ३९६, तर सन २०१५ मध्ये ११ हजार ७१३ विनयभंगाची प्रकरणे नोंदविण्यात आली. २०१५ आणि २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये लैंगिक अत्याचारप्रकरणी नोंदविलेल्या गुन्ह्यात (८६४) घट झाली. २८१ प्रकरणांमध्ये २०१७ साली अनैतिक व्यापाराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पती व नातेवाइकांकडून झालेली क्रूर कृत्ये २०१७ मध्ये ६२४२ राहिली, तर २०१६ मध्ये ७२१५ तर २०१५ मध्ये ७६४० प्रकरणे नोंदविण्यात आली.नऊ राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसराउत्तर प्रदेशात दरवर्षी सर्वाधिक महिला अत्याचार नमूद होतात. उत्तर प्रदेशासह गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा या राज्यांतील नोंदविलेल्या गुन्ह्यांचा विचार करता, या राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. गुजरात आणि केरळ राज्यात महिलांविषयक गुन्ह्यांची नोंद १० हजारांच्या आत आहे. उत्तर प्रदेशात तो आकडा ५० हजारांवर गेला आहे.

टॅग्स :Womenमहिला