शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील महिला कर्मचारी 'सेफ झोन'मध्ये

By admin | Updated: August 15, 2016 00:02 IST

राजधानी दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर राज्यभरात महिला तक्रार निवारण समिती नव्याने ठिकठिकाणी कार्यान्वित करण्यात आल्यात.

अध्यक्ष बदलल्या : विशाखा समितीकडे केवळ एक तक्रार अमरावती : राजधानी दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर राज्यभरात महिला तक्रार निवारण समिती नव्याने ठिकठिकाणी कार्यान्वित करण्यात आल्यात. त्यांना विशाखा समिती, असे नाव देण्यात आले. प्रत्येक शासकीय कार्यालयात विशाखा समिती नेमणे बंधनकारक केले. त्यानुसार महापालिकेतही विशाखा समितीचे गठन करण्यात आले. या समितीकडे दोन वर्षांत केवळ दोनच तक्रारी आल्याने महापालिकेतील महिला कर्मचारी सेफ झोनमध्ये असल्याचे सुखद वास्तव समोर आले.सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांच्याकडे विशाखा समितीचे अध्यक्षपद होते. त्यांनी सुमारे दीड वर्ष ही धुरा सांभाळली.त्यांच्या कार्यकाळातच या समितीकडे दोन तक्ररी दाखल झाल्या. त्यापैकी एक तक्रार प्रशासकीय बाबीत मोडणारी असल्याने ती संबंधितांकडे वर्ग करण्यात आली. त्याअनुषंगाने तक्रारकर्त्या कर्मचाऱ्यासह ज्या अधिकाऱ्यांवर आरोप आहेत, त्यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र घोंगे यांची बदली झाल्याने त्या चौकशीला ब्रेक बसला आहे. नवनियुक्त अध्यक्ष सुषमा ठाकरे यांच्या मते त्या एकमेव तक्रारीची चौकशीही अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेतील महत्त्वपूर्ण खुर्चीवर बसलेल्या एका अधिकाऱ्यांविरुध्द ती तक्रार आहे. तो विशिष्ट अधिकारी आपल्याकडे वाईट नजरेचे पाहत असल्याची ती तक्रार होती. तो अधिकारी चौकशीला सहकार्य करीत नव्हता. त्यामुळे या चौकशीत व्यत्यय आला. मात्र तीही चौकशी आता अंतिम टप्प्यात आली आहे. एकंदरितच दोन वर्षांत विशाखा समितीकडे महिला कर्मचाऱ्यांकडून केवळ २ तक्रारी आल्या आहेत.त्यामुळे अंबानगरीच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला कर्मचारी बिनधास्तपणे काम करीत असल्याची जाणीव अधिक बळकट झाली आहे.सुषमा ठाकरेंकडे अध्यक्षपद, तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी प्रतिभा आत्राम यांच्याकडे आहे. सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिक प्रतिभा घंटेवार या समितीच्या सदस्य सचिव आहेत. महिला व बालविकास अधिकारी नरेंद्र वानखडे, जनसंपकर अधिकारी भूषण पुसदकर सहायक शिक्षिका वैशाली कुऱ्हेकर,लघुलेखक सुनीता गुर्जर, कनिष्ट लिपिक शीतल राऊत आणि लिना आकोलकर या सदस्या आहेत. (प्रतिनिधी)फलकावर घोंगेच अध्यक्ष महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या पोर्च जवळ महिला तक्रार निवारण समिती -विशाखा समितीचा फलक लावण्यात आला आहे. या फलकावर अध्यक्षांसह समिती सदस्यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र घोंगे यांची बदली होऊन तीन महिने उलटत असताना त्यांचेच नाव अध्यक्षपदी कायम आहे. विशेष म्हणजे समितीतील काही सदस्य नव्या अध्यक्षांच्या नावाबाबत अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले आहे.सुषमा ठाकरेंकडे अध्यक्षपदाचे सुकाणू मावळत्या अध्यक्ष प्रणाली घोंगे यांची बदली झाल्यानंतर अध्यक्षपदाची धुरा महापालिकेच्या क्षय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या सुषमा ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी नुकतेच या पदाची सूत्रे हाती घेतली असून समिती सदस्यांसह बैठकही घेण्यात आली आहे. माहापालिकेत कंत्राटी सेवा देणाऱ्या एका अधिकाऱ्यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारींचे त्यांना निकाल लावणे अगत्याचे ठरणार आहे.