शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धारणीत अतिक्रमण निर्मूलन पथकाला महिलांनी हाकलले

By admin | Updated: January 13, 2016 00:15 IST

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या पथकाला महिलांनी परतवून लावले. त्यामुळे महिलाशक्तीसमोर पोलिसांसह प्रशासनही हतबल झाले.

४८ तासांचे अल्टिमेटम : पोलीसही झाले हतबलधारणी : शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या पथकाला महिलांनी परतवून लावले. त्यामुळे महिलाशक्तीसमोर पोलिसांसह प्रशासनही हतबल झाले. मंगळवारी दुपारी २ वाजतादरम्यान शासकीय भूखंडावर जवळपास ९ अतिक्रमितांनी ताबा घेऊन कच्चे घरे बांधण्याचा समाचार घेण्यासाठी महसूल, पोलीस व नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी व पदाधिकारी गेले होते. मात्र त्यांना महिलांनी हाकलून लावले.अतिक्रमण करून बसलेल्यांनी कर्मचाऱ्यांना हटकले. काहींनी पूर्वी करण्यात आलेली अतिक्रमणे प्रथम काढा नंतर आमच्याकडे या अशा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची कोंडी झाली. पोलीस बंदोबस्तात एकमात्र महिला शिपायाचे महिला शक्तीसमोर काहीच चालले नाही. त्यामुळे आणखी वाढीव बंदोबस्तात दोन दिवसांनंतर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पुन्हा राबविण्यात येणार असल्याचे पथकप्रमुख नायब तहसीलदार जी. ई. राजगडे यांनी जाहीर केले. तोपर्यंत आपापले अतिक्रमण स्वत:हून काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे ४८ तासाचे अल्टिमेटम मिळाल्याने तूर्तास अतिक्रमण धारकांना अभय मिळाले आहे.शासकीय जमिनीवरील वाढत्या अतिक्रमणाबाबत आजच ‘लोकमत’ने सचित्र बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत नायब तहसीलदार राजगडे, मंडळ अधिकारी सीताराम कास्देकर, तलाठी रूपेश गिरी, नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा रेखा पटेल, नगर पंचायतीचे कर्मचारी अमीन शेख हे पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यासाठी प्रभाग क्रमांक २ मध्ये दाखल झाले होते. यावेळी ९ अतिक्रमण करणाऱ्यांनीही महिलाशक्तीसमोर दंड थोपटून उभे होते. दरम्यान तक्रारकर्ते व अतिक्रमणधारकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. (तालुका प्रतिनिधी)