शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महिला व बालकल्याण : ८७३ अंगणवाडीत अंधार तर २७८ ठिकाणी पिण्याचे पाणी नाही

By जितेंद्र दखने | Updated: February 9, 2024 21:46 IST

चिमुकल्याना पुरेसा सोयीसुविधांपासून दूर

अमरावती: जिल्ह्यातील २ हजार ५९२ अंगणवाडी केंद्रापैकी ८७३ ठिकाणी वीजपुरवठा नसल्याने अंधार पसरला आहे तर २७८ अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे वास्तव समाेर आले आहे. परिणामी अंगणवाडी केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने चिमुकले सोयीसुविधांपासून वंचित आहे.

महिला व बालकल्याण विभागांतर्गत ग्रामीण भागात २ हजार ५९२ अंगणवाडी केंद्र कार्यान्वित आहेत. यापैकी आजघडीला १ हजार ४६६ ठिकाणीच वीजजोडणी आहे. तर ८७३ केंद्रामध्ये अंधार असून यामध्ये ६८ केंद्र भाड्याचे ठिकाणी आहेत तर ८६ केंद्र शाळेत कार्यरत असून इतर ठिकाणी ९९ कार्यरत आहे. याशिवाय २३१४ आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा असली तरी अजूनही २७८ अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे.त्यामुळे अंगणवाडी शिकणाऱ्या चिमुकल्याची ताहन बाहेरून पाणी आणून भागवावी लागत आहे. एकीकडे अंगणवाडी केंद्रामध्ये डिजिटल शिक्षण देण्याचे प्रयत्न होत असता अनेक अंगणवाडी केंद्राच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. असे असताना मात्र, वीज आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

२७८ अंगणवाड्या नळजोडणीविनाजिल्ह्यातील २५९२ अंगणवाड्यांमध्ये १०० टक्के नळजोडणी झालेली नाही.२७८ ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्याने याचा अंगणवाडीत पोषण आहार शिजविण्यासह चिमुकल्याची तहान भागविण्यासाठी कसरत होत आहे. त्यात चांंदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक ५४ ठिकाणी नळजोडणी नाही तर धारणी तालुक्यातील २३३ अंगणवाडी केंद्रापैकी सर्वाधिक १६८ ठिकाणी विजेचा अभाव आहे.आयुक्तालय स्तरावरून अंगणवाडी केंद्रात वीज जोडणीसाठी सौरऊर्जेवर आधारीत विजेची व्यवस्था केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ज्या ठिकाणी वीज नाही अशा अंगणवाडी केंद्रात प्राधान्याने वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल तर जेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही अशा ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत उपायोजना केल्या जातील. डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण

टॅग्स :Amravatiअमरावती