शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची विष पाजून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:01 IST

ई-क्लास जमिनीवरील पिकाच्या वादातून एका महिलेची शेतात जबरीने विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ही घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साऊरजवळील रामा नारायणपूर शिवारात घडली.

ठळक मुद्देसाऊर रामानारायणपूर येथील घटना : ई-क्लास जमिनीवरील पिकांचा वाद

आॅनलाईन लोकमतअमरावती : ई-क्लास जमिनीवरील पिकाच्या वादातून एका महिलेची शेतात जबरीने विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ही घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साऊरजवळील रामा नारायणपूर शिवारात घडली. संगीता प्रल्हाद चव्हाण (३२) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रामेश्वर धर्माजी चव्हाण व त्याची पत्नी चंचला यांना अटक केली.रामा साऊर येथील ई-क्लास जमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून पिकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. पिकावरून संगीता चव्हाण व आरोपी रामेश्वर चव्हाण यांच्यात वाद होता. शनिवारी सकाळी संगीता ही तिच्या चार वर्षीय वैभवी नामक मुलीसोबत शेतात हरभरा काढण्यासाठी गेली होती. यादरम्यान तेथे रामेश्वर चव्हाण व त्याची पत्नी दाखल झाली. त्यांनी संगीताशी वाद घातला, मारहाण केली आणि जबरीने विष पाजल्याचा आरोप संगीताच्या कुटुंबीयांनी केला. हा प्रकार घडत असतानाच संगीताची सासू रेखा रामदास चव्हाण शेतापर्यंत पोहोचल्या. त्यांनी संगीताला ११.१० वाजता गंभीर अवस्थेत अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. अवघ्या १० मिनिटांत तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नातेवाइकांचा रोष उफाळून आला. तणावाची परिस्थिती पाहून वलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुरुळकर, एपीआय महेश नरवणे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले आणि नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले. सायंकाळी संगीताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर तिचे पार्थिव नातेवाइकांनी थेट वलगाव पोलीस ठाण्यात नेण्याची भूमिका घेतली. आरोपींना अटक केल्याशिवाय शव उचलणार नसल्याचा त्यांचा पवित्रा होता. पोलिसांनी त्यांची समजूत काढली. यानंतर संगीताची सासू रेखा चव्हाण यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी रामेश्वर चव्हाण व चंचला चव्हाण यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. दोघांनाही रात्री अटक करण्यात आली. घटनेमुळे गावात तणाव असल्याने पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.पोलीस आयुक्तांपर्यंत गेला होता वादअनेक वर्षांपासून या दोन कुटुंबीयांत ई-क्लास जमिनीच्या पिकावरून वाद सुरू आहे. मध्यंतरी हे दोन्ही कुटुंबीय एकमेकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी वलगाव ठाण्यापर्यंत पोहोचले. वाद चिघळत असल्याचे पाहून पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यातील एक कुटुंब वलगाव पोलिसांविरोधात पोलीस आयुक्ताकडे गेले. मंत्रालयातील पदाधिकाºयांकडून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. यासंबंधाने वलगाव पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना पोलीस आयुक्तांसमोर हजर केले होते.ई-क्लास जमिनीवरील पिकांचा वाद अनेक वर्षांपासून सुरू होता. यासंदर्भात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत. शनिवारी महिलेच्या मृत्यूप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.- अनिल कुरुळकर, पोलीस निरीक्षक वलगाव ठाणे