शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत महिला पोलीस कर्मचारी ठार; मद्यपीने दिली मागून धडक

By प्रदीप भाकरे | Updated: September 24, 2023 12:08 IST

अतिरक्तस्त्रावाने मृत्यू

अमरावती: स्थानिक गाडगेनगरस्थित गाडगेबाबा मंदिरानजिक मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेली महिला पोलीस कर्मचारी जागेवरच ठार झाली. २४ सप्टेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात घडला. दारूच्या नशेत धडक देणाऱ्या वाहनचालकास अटक करण्यात आली.

प्रियंका बोरकर (२६, रा. शेगाव, अमरावती) असे अपघातात ठार झालेल्या महिला पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्या ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (सिआरओ) कार्यरत होत्या. सर्व पोलीस ठाण्यातून नोंद गुन्ह्याची माहिती घेऊन त्या रात्री दोनच्या सुमारास ड्युटी संपवून पती सागर रमेश सिरसाट (रा. शेगाव) यांच्यासह मोपेडने घराच्या दिशेने शेगाव नाक्याकडे जात होत्या. त्यावेळी गाडगेबाबा मंदिरासमोरील रस्त्यावर मागून आलेल्या भरधाव दुचाकीने (एमएच १२ आर डब्ल्यू ७५३०) त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. यात प्रियंका यांच्या डोक्याला व शरिराच्या अन्य भागाला जबर मार लागला. त्यामुळे घटनास्थळीच त्यांना अतिरक्तस्त्राव झाला. पती सागर सिरसाट यांनी पत्नी प्रियंका हिला काहींच्या सहकार्याने तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र अतिरक्तस्त्रावाने प्रियंका यांचा रविवारी पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरोपी घटनास्थळीच पकडला

सागर सिरसाट यांच्या दुचाकीला मागून धडकताच दुचाकीस्वार गौरव गोपाल मोहोड (३३, रेखा कॉलनी) हा देखील दुचाकीसह खाली कोसळला. तो मद्यधुंद अवस्थेत तेथेच पडून राहिला. गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

२०१७ पासून होत्या कार्यरत

पोलीस सुत्रानुसार, प्रियंका बोरकर या सन २०१७ मध्ये अमरावती ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवर पोलीस अंमलदार म्हणून रूजू झाल्या होत्या. तर गेल्या एक वर्षांपासून त्या ग्रामीण मुख्यालयी नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. दरम्यान, अपघाताची माहिती कळताच ग्रामीण वाहतूक शाखेचे प्रमुख गोपाल उंबरकर यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. अंतिमसंस्कारावेळी ग्रामीण पोलिसांतर्फे प्रियंका यांना श्रध्दांजली देण्यात येणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती