मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : भरीव निधी देणारधामणगाव रेल्वे : धामणगाव शहर विकासाकरिता भरीव निधी देणार असून मतदारसंघातील समस्या प्राधान्यांनी सोडवून विकास करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडवणीस यांनी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड यांना दिले़धामणगाव नगर परिषद परिसरात भाजप नेते अरूण अडसड यांच्या पुढाकाराने अवघ्या साडेचार वर्षांत ९ कोटी रूपयांची विकास कामे झाली आहे़ आगामी १० वर्षांकरिता नगरपरिषदेने विकास आराखडा तयार केला आहे़ धामणगाव शहरात वीज निर्मिती करणारा सोलर पॉवर प्लन, बुधवार बाजाराचे स्थानांतरण, नव्याने शैक्षणिक संकुल लॉजिस्टिक पार्क, स्वीमिंग पूल, सार्वजनिक वाचनालय, टाऊन हॉल, अॅनिमेस्टिक पार्क, चंद्रभागा नदीचे सौंदर्यीकरण, सराफ पार्क, जालना जीन या परिसरात सार्वजनिक बगिच्याची निर्मिती, दत्तापूरच्या पूर्व भागात खेळाचे मैदान, नेहरू मैदान परिसरात खुले रंगमंच, शहराच्या लुणावतनगर भागात व्यापारी संकुल, संपूर्ण शहरात भुयारी मार्गाच्या नाल्या, सोलर लाईट, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, घनकचरा व्यवस्थापन, प्रत्येक चौकाचे सौंदर्यीकरण असे विकास कामे आगामी काळात करण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे़ यासंदर्भात मुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस यांची भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड यांनी मुंबईत भेट घेऊन विकास आराखडा संदर्भात चर्चा केली़ तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात विविध प्रकल्प यावेत या भागातील विकास कामांना गती मिळावी. यासंदर्भात माहिती दिलीत धामणगाव चांदूर रेल्वे नगरपरिषदेला भरीव निधी मिळावा, अशी मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)
धामणगाव रेल्वेला येणार काही दिवसांतच चकाकी
By admin | Updated: May 30, 2016 00:39 IST