शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शहाण्यांनी चढावी पोलीस, कोर्टाची पायरी

By admin | Updated: September 15, 2015 00:09 IST

‘शहाण्या व्यक्तीने कोर्टाची पायरी चढू नये’, या सर्वव्याप्त मान्यतेला अमरावतीचे जिल्हा न्यायाधीश (प्रथम) एस.एस.दास यांनी खुले आव्हान दिले.

एस.एस. दास यांचे प्रतिपादन : पार्डी गावात न्यायाधीशांची मांदियाळीअंजनगाव बारी : ‘शहाण्या व्यक्तीने कोर्टाची पायरी चढू नये’, या सर्वव्याप्त मान्यतेला अमरावतीचे जिल्हा न्यायाधीश (प्रथम) एस.एस.दास यांनी खुले आव्हान दिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकारण आणि स्वराज्य मित्र सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अमरावती तालुक्यातील पार्डी (देवी) येथे शनिवारी आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते.शहाण्या माणसाने कधीही अन्याय सहन करू नये; आपल्यासमोर किंवा शेजारची कोणी स्त्री मार खात असेल तर शहाण्या माणसाने कधीही गप्प बसू नये; त्याविरोधात पोलीस स्टेशन आणि कोर्टात नक्कीच जायला हवे; आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याला साथ देणे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे सुस्पष्ट प्रतिपादन न्यायाधीश दास यांनी केले. जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. मालमत्ता व वारसा अधिकारातील स्त्रियांसाठी असलेल्या तरतुदी एका सोप्या गोष्टीतून जिल्हा न्यायाधीश (तृतीय) श्रीमती एस.एस. भीष्म यांनी गावकऱ्यांना समजावून दिले. आजकाल लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १८ वर्षांखालील मुलांवरील लैंगिक अत्याचारास प्रतिबंध घालणारा व त्यासाठी गुन्हेगारास कठोर दंडाची तरतूद करणारा पोस्को (पीओसीएसओ) कायद्याची प्राथमिक ओळख त्यांनी करून दिली. कौटुंबिक वाद, पोटगी, बालन्याय कायदा यासंदर्भात सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) जे.पी. शिराळे यांनी माहिती शिबिरातील उपस्थित नागरिकांना दिली.पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अभियानाची विस्तृत माहिती देत गटविकास अधिकारी प्रमोद कापडे व सहायक गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी स्त्री भ्रूणहत्या थांबविण्याचे आवाहन केले. बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत ४४ गावांपैकी पार्डी (देवी) गाव खरोखरच तंटामुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे गाव पुरस्कारास पात्र असल्याबद्दल पोलीस अधिकारी डी.एस. कडू यांनी येथे समाधान व्यक्त केले. संचालन सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस.एन. माने-गाडेकर यांनी केले. दिवाणी न्यायाधीश एस.एस. ओझा यांनी प्रास्ताविक केले. स्वराज्यमित्र सामाजिक संस्थेचे सचिव राहुल बैस यांनी आभार प्रदर्शन केले. पार्डी (देवी) गावच्या सरपंच रेखा कडव, माजी सरपंच रेखा सरदार, उपसरपंच नगराळे, ग्रामपंचायत सदस्य, स्वराज्य मित्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता श्रृती मेहता, न्यू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता भेंडे व सचिव, मुख्याध्यापक पी.झेड. बांडाबुचे, शिरीष जाखड उपस्थित होते. (वार्ताहर)