शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासगट समितीची शिफारस ३० सप्टेंबरपर्यंत होईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:16 IST

गणेश वासनिक - अमरावती : अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या पदावर सेवेत नियुक्ती मिळविल्यानंतर ...

गणेश वासनिक - अमरावती : अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या पदावर सेवेत नियुक्ती मिळविल्यानंतर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करून अधिनियम २००० मधील कलम १० व ११ अन्वये त्यांच्याविरुद्ध कारवाईचे निर्देश ६ जुलै २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकडे मात्र अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिसंख्य पदावर वर्ग करून अशांना आश्वासित प्रगती योजना, पदोन्नती, वार्षिक वेतनवाढ, निवृत्ती वेतन, कुटुंब सेवानिवृत्ती वेतन, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती यांसारखे व इतर सेवाविषयक लाभ देण्यात यावेत किंवा कसे, याबाबत शासनास शिफारस करण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यासगट समितीला चक्क तीनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. २३ ऑगस्ट रोजी काढलेल्या शासननिर्णयान्वये या अभ्यास गटाला ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने २१ डिसेंबर २०१९ रोजी शासननिर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयात ही सूचना देण्यात आली.

बाॅक्स

शिफारस करण्यास तारीख पे तारीख

१५ जून २०२० रोजी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली. या अभ्यासगट समितीला तीन महिन्यात म्हणजे १५ सप्टेंबर २०२० पर्यंत शिफारशी करायच्या होत्या. पण, नंतर ५ ऑक्टोबर २०२० च्या शासननिर्णयान्वये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत अभ्यास गटाला मुदतवाढ देण्यात आली. पुढे १७ फेब्रुवारी २०२१ रोजी शासननिर्णय काढून ३० जून २०२१ पर्यंत अभ्यास गटाला मुदतवाढ देण्यात आली. आता २३ ऑगस्ट रोजी शासननिर्णयान्वये ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत अभ्यासगट समितीला अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अशाप्रकारे तारीख पे तारीख सुरू आहे.

कोट

शासनास शिफारस करण्यासाठी अभ्यास गटाने तीनदा मुदतवाढ घेतली. आता मात्र मुदतवाढ नाही, तर शिफारस करावी, या करीता अभ्यास गटाच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांना निवेदन पाठविले आहे.

- प्रमोद घोडाम संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम.