शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

हा तर राष्ट्रसंतांच्या इच्छाहेतूचाच सफाया!

By admin | Updated: February 21, 2016 00:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो राष्ट्रधर्म मांडला तो राष्ट्रभर प्रचारित व्हावा, या महत्त्वपूर्ण उद्देशाने खुद्द महाराजांनीच आश्रमाची स्थापना राष्ट्रीय महामार्गालगत केली होती.

गावकऱ्यांचा विरोध : गुरुकुंज मोझरीच्या अस्तित्वावर घालाराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो राष्ट्रधर्म मांडला तो राष्ट्रभर प्रचारित व्हावा, या महत्त्वपूर्ण उद्देशाने खुद्द महाराजांनीच आश्रमाची स्थापना राष्ट्रीय महामार्गालगत केली होती. वळणरस्त्याच्या निर्णयाआडून आता महाराजांच्या मूळ हेतुचाच सफाया केला जाणार आहे. महाराजांच्या इच्छेचा अनादर करणारे हे कृत्य असणार आहे. काही विघ्नसंतोषी लोकांच्या कारवायांमुळे हे घडू शकले. गुरुकुंज मोझरी गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ तडकाफडकी गावाबाहेरून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कोलकाता-मुंबई या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्याने अनेक गावांमधून जाणाऱ्या या महामार्गावर गावोगावी उड्डाण पूल उभारले गेले आहेत. तसाच उड्डाणपूल गुरुकुंज-मोझरी गावातदेखील नियोजित आहे. तथापि, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आश्रम आणि समाधी या पवित्र स्थळांचा आडोसा घेत प्रस्तावित उड्डाणपुलाला काही विघ्नसंतोषींनी विरोध केला. हा सारा विषय राष्ट्रसंतांशी आणि परिणामी लोकभावनेशी निगडित असल्याने अवघे प्रशासन आणि कंत्राटदारही चार पावले मागे येत असल्याचे जाणवते.गावातून जाणाऱ्या उड्डाण पुलाऐवजी गावाबाहेरून जाणाऱ्या सहा किमी लांबीच्या वळण रस्त्याचा पर्याय पुढे आला आहे. यदाकदाचित हा वळण रस्ता अस्तित्वात आला तर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, वेगवान होईल, काही लोक जे वळण रस्त्याचा आग्रह धरत आहेत, ते खूश होतील. कदाचित आपले राजकारण यशस्वी झाल्याचा आनंददेखील ते काही काळ साजरा करतील. पण, गुरुकुंज मोझरीच्या गळ्याभोवती आवळल्या जाणाऱ्या फासाच्या वेदनांवर हा आनंद अंकुरीत झालेला असेल. आज गुरुकुंज मोझरी हे गाव राष्ट्रीय महामार्गावर वसलेले गाव आहे. त्याचमुळे या गावात जिवंतपणा आहे. वाहनांची-लोकांची वर्दळ आहे. राष्ट्रसंतांचा आश्रम आणि समाधीस्थळ महामार्गालगत असल्याने सर्वसामान्यांना महासमाधीचे दर्शन सहज उपलब्ध आहे. या महामार्गामुळेच मोझरीशिवाय पंचक्रोशीतील पाच-पन्नास गावचे लोक परिसराशी जुळलेले आहेत. महामार्गावरील प्रवासी, देश-विदेशातून या परिसरात येणारे पर्यटक यांना राष्ट्रसंत आणि त्यांच्या कार्याबद्दल आस्था, जिव्हाळा आहे. काही वर्षांत या गावात जी विकासकामे उभी झालीत, त्यामुळे हे गाव आता ग्रामीण आपुलकी जपलेल्या छोट्याशा शहरात रुपांतरित झाले आहे. गावातून जाणाऱ्या महामार्गामुळेच हे सारे शक्य झाले आहे. -तर मोझरीचे अस्तित्त्वच संपणार!हा महामार्ग गावाबाहेरुन वळण रस्त्याच्या स्वरुपाने अस्तित्वात आला तर काय होईल? या प्रकरणाचे गंभीर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दुष्परिणाम होणार आहेत. आज गावात वर्दळ असल्याने येथील व्यापार वाढला आहे. गाव महामार्गावर असल्याने आणि अमरावती शहराला जवळ असल्याने येथे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्ग नसेल तर आर्थिक विकासाच्या या साऱ्या संधी संपुष्टात येतील. राष्ट्रसंतांच्या राष्ट्रधर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या केंद्रांच्या अभ्यागतांवर विपरीत परिणाम होईल. राष्ट्रधर्माची शिकवण देणारी ही केंद्रे ओस पडतील. राष्ट्रसंतांच्या कार्यालयाला खीळ बसेल. या गावात राष्ट्रसंतांनी महत्प्रयासाने उभे केलेले सामाजिक, सांस्कृतिक वैभव नष्ट होईल. अर्थात् राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून गुरुकुंज मोझरीचे अस्तित्त्वच पुसले जाईल. आज विकासाची आस बाळगून असणारे छोटेखानी गाव पुन्हा एकदा मागासलेपणाच्या गर्तेत लोटले जाईल. कसदार शेतीही जाणार!नवीन वळण रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागते. त्यात कसदार जमिनी जातील. शेतकरी विरुद्ध प्रशासन, असा संघर्ष उभा ठाकेल. आजचे शांततेचे वातावरण बिघडेल. सलोखा समाप्त होईल. सारे वातावरण असंतोषाचे अविश्वासाचे आणि तणावाचे होऊन बसेल. हे सारे टाळण्यासाठी गुरुकुंज-मोझरीच्या जीवनात येऊ पाहणारे हे नवे विध्वंसक वळण गर्भावस्थेतच उखडून फेकण्याची गरज आहे.गुरुकुंज मोझरीच्या अस्तित्त्वावर घाला घालणाऱ्या या संकटाचा सामना आता गुरुकुंज-मोझरीवासीयांनाच करावा लागणार आहे. ४भय्यासाहेब ठाकूरमाजी आमदार, तिवसा.