शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णालयांतील कंत्राटी कर्मचारी होणार कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:09 IST

कॅप्शन - राज्याच्या नगरविकास विभागाने जारी केलेले पत्र हालचालींना वेग, आरोग्य विभागाचा पुढाकार, महापालिका आयुक्तांना पत्र कॉमन गणेश वासनिक ...

कॅप्शन - राज्याच्या नगरविकास विभागाने जारी केलेले पत्र

हालचालींना वेग, आरोग्य विभागाचा पुढाकार, महापालिका आयुक्तांना पत्र

कॉमन

गणेश वासनिक (पत्र घेणे )

अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोविड-१९ च्या काळात कंत्राटी पद्धतीेने शासकीय रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये अहोरात्र सेवा बजावणारे डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने त्याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा चालविला आहे.

नगरविकास विभागाने ३ जून २०२१ रोजी राज्याचे सर्व महापालिका आयुक्त, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा संचालकांना कोरोना रुग्णालयांत उत्तम आणि अविरतपणे सेवा देणारे कंत्राटी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत कळविले आहे. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाच्या अवर सचिवांच्या पत्राचा दाखला देण्यात आला आहे. कल्याण-पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी २३ फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोविड-१९ च्या काळात कंत्राटी पद्धतीेने आरोग्य सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडणारे हद्‌यस्पर्शी पत्र लिहिले होते. आ. गायकवाड यांच्या पत्राचा आधारही आरोग्य विभागाने घेतला असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी प्रशासकीय प्रवास सुरू झाला आहे. शासनाने मंजुरी दिल्यानंतर कोरोना रुग्णसेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम होण्याची संधी मिळेल, असे संकेत आहेत.

----------------

कंत्राटींच्या सेवेने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी

सार्वजनिक आरोग्य विभागात हजारो पदे रिक्त आहेत. गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले. आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. राज्य शासनाने डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने भरती केली. या कंत्राटींनी अतिशय तन्मयतेने कोरोना रुग्णांची सेवा केली आहे. शासकीय रुग्णालयात कोरोना रूग्णांना भरती करणे, औधषोपचारपासून तर अंत्यविधीपर्यंतची कामे केली आहेत. आजतागायत हे कंत्राटी सेवा बजावत आहे. कोविड-१९ च्या काळात कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले नसते, तर आराेग्य यंत्रणेचा पुरता बाेजवारा उडाला असता, हे वास्तव आहे.

-------------

कोट

कोविड-१९ च्या काळात शासकीय रुग्णालयांत सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करताना प्राधान्य राहील. मात्र, तूर्त अशा प्रकारचे कोणतेही शासनाचे पत्र प्राप्त झालेले नाही. तशा काही गाईडलाईन आल्यास नक्कीच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले जाईल.

- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.