लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील हनुमंत साखरकर (४०) खूनप्रकरणाचा गुंता मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी उघड केला. त्याचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे पोलीस तपासात पुढे आले. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी दोघांनाही खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. या खुनाची ५० हजारांत सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. २६ पर्यंत पीसीआरहनुमंत साखरकर याचा मृतदेह पोत्यात बांधलेला व गळ्याला वायराने फास दिलेला वर्धा नदीपात्रात पोलिसांना गुरुवारी मिळाला. प्रथम खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. उमेश प्रभाकर सावळीकर (३५) व मृत हनुमंतची पत्नी अनुराधा हिला शुक्रवारी उशिरा रात्री पोलिसांनी अटक केली.मुलामुळे फुटले हत्येचे बिंगमृत हनुमंताचा आठ वर्षांचा मुलगा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी त्याच्यासोबत गेला होता. पोलिसांनी मुलाला हेरून तपासाची चक्रे फिरविली. वडिलांना उमेश सावळीकरचा फोन आल्यामुळे ते निघून गेले, असे मुलाने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे, ज्या दिवशी हनुमंतचा खून झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी अनुराधाने पोलीस ठाण्यात हनुमंत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली, तर उमेश परिसरात राहून चौकशी करीत होता. शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय सूरज बोंडे व एपीआय नरेंद्र पेंदोर या पथकाने उमेश व अनुराधा यांना ताब्यात घेतले. प्रथम दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच पतीची हत्येची सुपारी देण्यासाठी उमेश सावळीकरला सांगितल्याची कबुली अनुराधाने पोलिसांत दिली. हत्येनंतर उमेश व अनुराधा यांच्यात अनेक कॉल झाल्याची माहिती पोलिसांनी काढली. हत्येची सुपारी घेणाºया दोघांना अटक करण्यासाठी मंगरूळ दस्तगीर पोलीस पथक अमरावती, वर्धा या भागात दुय्यम ठाणेदार प्रकाश वानखडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी रात्री कार्यान्वित करण्यात आले.असा रचला खुनाचा कटआरोपी उमेश व मृत हनुमंताची पत्नी अनुराधा या दोघांचे एक वर्षापासून प्रेमसूत जुळले. ही बाब हनुमंतला माहिती मिळाल्याने पती-पत्नीचे नेहमी वाद होत असत. १४ फेब्रुवारी रोजी गावातील महोत्सवात हनुमंत आपल्या मुलीचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी आला होता. उमेश व अनुराधा यांनी पूर्वीच त्याच्या हत्येची ५० हजाराची सुपारी दोघांना दिली होती. त्यामुळे कटानुसार प्रथम उमेशने हनुमंताला निंबोली रस्त्यावर बोलावून घेतले. मात्र, दुचाकी बंद पडल्याने तू मला घेण्यासाठी ये, असा कॉल हनुमंतने उमेशला केला. आरोपींनी अंधाराचा फायदा घेत हनुमंतचा गळा इलेक्ट्रिक वायरने आवळला व लगेच मृतदेह पोत्यात भरून वर्धा नदीच्या पात्रात फेकून दिला.दोन संसार उघड्यावरमृत हनुमंत साखरकर हा ऑटोरिक्षा चालवित होता. त्याच्या पश्चात चौथीत शिकणारी मुलगी व आठ वर्षाचा मुलगा आहे. आरोपी उमेश सावळीकर याचे गावातच कपड्याचे दुकान तसेच डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्याला पत्नी, मुलगा व मुलगी आहे. दोन्ही संसार आता उघडे पडले आहेत.आरोपी उमेश सावळीकर याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. ज्यांनी या हत्याकांडाची सुपारी घेतली, त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.- दीपक वळवी, ठाणेदार, मंगरूळ दस्तगीर
पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST
हनुमंत साखरकर याचा मृतदेह पोत्यात बांधलेला व गळ्याला वायराने फास दिलेला वर्धा नदीपात्रात पोलिसांना गुरुवारी मिळाला. प्रथम खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. उमेश प्रभाकर सावळीकर (३५) व मृत हनुमंतची पत्नी अनुराधा हिला शुक्रवारी उशिरा रात्री पोलिसांनी अटक केली.
पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा
ठळक मुद्देसंडे अँकर । दोघांना अटक, हनुमंत साखरकर हत्याप्रकरण, ५० हजारांची सुपारी