शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने केली पतीची हत्या

By admin | Updated: June 24, 2017 00:04 IST

नजीकच्या मांडवा येथील बळीराम कास्देकर यांची हत्या पत्नीने केल्याचा खुलासा झाला आहे.

मांडवा येथील घटना : गळा आवळून खून लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : नजीकच्या मांडवा येथील बळीराम कास्देकर यांची हत्या पत्नीने केल्याचा खुलासा झाला आहे. धारणी पोलिसांनी याप्रकरणी पत्नी जीजीबाई रामलाल कास्देकर (४०,रा. मांडवा) हिला अटक केली आहे. तिने आपल्या जबाबात हत्या केल्याचे कबूल केले. बळीराम हिराजी कास्देकर (३९, रा. टाकरखेडा) यांचा २० जून रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल केला होता. प्राप्त माहितीनुसार, बळीरामच्या पहिल्या पत्नीचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर आरोपी जिजीबाई Þहिच्या पतीचा देखील मृत्यू झाला होता. बळीराम व जीजीबाई हे दोघेही वर्षभरापासून एकमेकांसोबत एकत्र राहात होते. बळीरामला व्यसन असल्याने त्यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. २० जूनला त्यांच्यात वाद झाला. या वादातूनच पत्नी जीजीबाई हिने मध्यरात्री टॉवेलने गळा आवळून त्याची हत्या केली. मात्र, २२ जून रोजी बळीरामचा भाऊ शंकर कास्देकर याने बळीरामची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. शवविच्छेदन अहवालातही बळीरामचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी जीजीबाईची चौकशी केली. यानंतर तिने बळीरामची हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी जीजीबाईविरूद्ध ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जीजीबाईची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.