शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘मनभरी’विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?

By admin | Updated: September 30, 2016 00:23 IST

चिवड्यात आढळलेल्या पालीच्या मुद्यावरून कायद्याच्या नियमांनुसार मनभिरीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता.

सब चलता है... : अमरावतीत एफडीएची गरज तरी काय ? अमरावती : चिवड्यात आढळलेल्या पालीच्या मुद्यावरून कायद्याच्या नियमांनुसार मनभिरीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. अन्न, औषधी प्रशासनाला तशी फौजदारी तक्रार नोंदविण्याचे अधिकार आहेत. परंतु संबंधित विभागाने ते का टाळले, हे गूढ आहे. एखाद्या खाद्यपदार्थात पाल किंवा कुठलाही हानीकारक पदार्थ आढळल्यास फौजदारी गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची दखल घेतली जाणे आवश्यक आहे. मानवी शरीराला अपाय पोहोचविणारा कुठलाही पदार्थ खाद्यान्नात आढळल्यास, तो खाल्ल्यामुळे उलट्या झाल्यास तो शरीराला अपायकारक आहे, असे संकेत मिळतात. अन्न औषधी प्रशासन विभागाने या मुद्याची तातडीने दखल घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त करवून घेणे महत्त्वाचे ठरते. संबंधित ग्राहकही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गेल्यास त्यांनी घेतलेली 'ट्रीटमेंट' अधिकृत पुरावा ठरते. मुळात ज्या ग्राहकाने बाधित अन्नाचे सेवन केले त्या ग्राहकाला झालेला आरोग्याविषयीचा त्रास हादेखील पुरावाच ठरतो. त्याने तक्रार केली असल्यास त्यानुसार प्रक्रिया करून वा तक्रार केली नसल्यास संबंधित ग्राहकाचे बयाण नोंदवून अन्न औषधी प्रशासनाने फौजदारी प्रक्रियेची तयारी आरंभायला हवी. मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात आढळलेली पाल शरीराला घातक ठरू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. पालीच्या सेवनाने विषबाधा होऊ शकते. पालीने सेवन केलेले कीटक मानवी शरीराला घातक असणाऱ्या श्रेणीतील असतील तर त्यामुळेदखील शारीरिक अस्वास्थ्य निर्माण होऊ शकते. पाल ज्या भागात फिरते, त्या भागात असलेले जिवाणू मानवी शरीरात आजार निर्माण करणारे असू शकतात. तसे जिवाणू पूर्ण खाद्यान्नात वाढीस लागले आणि ते अन्न सेवन केले गेले तर मानवी आरोग्याला अपाय निर्माण होऊ शकतो. या सर्वच शक्यता मनभरी चिवड्यात आढळलेल्या पालिच्या अनुषंगाने निर्माण झाल्या आहेत. तरीही बळ मनभरीच्याच पारड्यात आहे. (प्रतिनिधी)