लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाळ्यात प्रवास करताना जिवाची लाहीलाही होते. घामाच्या धारा वाहतात. त्यामुळे अनेक नागरिक प्रवासासाठी वातानुकूलित वाहनाला पसंती देतात. यावर उपाययोजना म्हणून राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बस प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध केल्या आहेत. परंतु, मध्यंतरी काही शिवशाही बस बंद पडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे शिवशाही प्रवाशांना शिवशाही नकोशी वाटत होती. परंतु, जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या शिवशाही बस ठीक असल्यामुळे प्रवासी वातानुकूलित शिवशाही बसला प्राथमिकता देत आहेत.
उन्हाळा सुरू होताच, शाळेला सुट्टया जाहीर होतात. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांसोबत विरंगुळा करण्यासाठी अनेक ठिकाणी जाण्यासाठी बसच्या उपयोजना करीत असतात. काही नागरिक लग्नासाठी पाहुण्यांकडे जात असतात. त्यामुळे बसला गर्दी होत असते. अशातच काही नागरिकांना वातानुकूलित बसचा प्रवास सहन होत नाही. त्यामुळे ते साध्या बसचा उपयोग करत असतात.
ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढलेशिवशाही बसेसमधील एससी मध्ये वारंवार बिघाड येत असल्याने वाटेतच या गाड्याच्या ब्रेक डाऊन वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांचीही गैरसोय होते.
कोणत्या आगाराकडे किती शिवशाही ?आगार शिवशाही बसअमरावती १३बडनेडरा ११परतवाडा ५वरूड ५दर्यापूर ५
जिल्ह्यात ३९ शिवशाहीअमरावती विभागात राज्य परिवहन महामंडळाचे आठ एसटी आगार आहेत. यामध्ये ३९ शिवशाही बस आहेत. या बस केवळ पाच आगारांतच शिवशाही बस उपलब्ध करून दिल्या आहेत. उर्वरित तीन आगारांत शिवशाही बस नाहीत.
शिवशाही बंद पडल्याच्या यांत्रिकीकडे ६ तक्रारीएसटी महामंडळाडून प्रवासी वाहतुकीसाठी धावत असलेल्या शिवशाही बसमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना वाढत आहेत. गत काही दिवसांमध्ये शिवशाही बसमध्ये वाटेत बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
"एसटी महामंडळाच्या अमरावती विभागातील ८ पैकी ५ पाच आगारांत शिवशाही बस आहेत. यापैकी काही बस तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याच्या सहा तक्रारी होत्या. त्यानुसार या बस दुरुस्तीनंतर प्रवासी सेवेत आजघडीला धावत आहेत."- स्वप्निल धनाड, यांत्रिकी अभियंता, एसटी महामंडळ