शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

-तर कशासाठी निवडले थेट जनतेतून सरपंच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:20 IST

जनतेमधून थेट सरपंच निवडीचा कायदा करताना केलेल्या चुकांशी आमचा संबंध काय, आमच्या अधिकारावर गदा आणून पदापासून वंचित ठेवण्याचे घटनाबाह्य कार्य करण्याचा शासनाला कुणी अधिकार दिला?

ठळक मुद्देटेंब्रुसोंडा येथील सरपंचांचा सवाल : ही तर अधिकारावर गदा

आॅनलाईन लोकमतचिखलदरा : जनतेमधून थेट सरपंच निवडीचा कायदा करताना केलेल्या चुकांशी आमचा संबंध काय, आमच्या अधिकारावर गदा आणून पदापासून वंचित ठेवण्याचे घटनाबाह्य कार्य करण्याचा शासनाला कुणी अधिकार दिला? आयोगाने पूर्वीच का नाही लक्ष दिले? सरपंचपदी निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिल्यावर पदभार सांभाळण्यापासून वंचित ठेवून थेट प्रशासकाची निवड करता, तर मग हे प्रमाणपत्रच परत घ्या, असा संतप्त सवाल टेंब्रुसोंडा येथे थेट जनतेमधून निवडून आलेल्या आदिवासी महिला सरपंच उर्मीला दहीकर यांनी प्रशासनाला केला आहे.जिल्ह्यातील सात सरपंचांना पदभार न देता शनिवारी प्रशासक नेमणुकीचे आदेश जिल्हाधिकाºयांनी जि.प.सीईओंना दिले. पं.स. प्रशासनाने चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोंडा, सोनापूर, मेहरीआम, धारणी तालुक्यातील बोबदो, जामपाणी, भातकुलीच्या बैलमारखेडा व चांदूर बाजार तालुक्यातील मिर्झापूर ग्रामपंचायतींवर सरपंचाऐवजी प्रशासकाची नेमणूक केली. ५० टक्के पेक्षा अधिक जागा रिक्त असल्याने येथे रविवारची उपसरपंचपदाची निवडणूक रद्द केली आहे. सरपंचपदाच्या अधिकारावर गदा आणणाºया ठरल्या.मग प्रमाणपत्रच परत घ्या ना !आपण आदिवासी महिला सरपंच आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार थेट जनतेतून निवडून आले. प्रशासक निवडण्यापेक्षा सरपंचपदाचे दिलेले प्रमाणपत्रच परत घ्या. अगोदर कायद्यात योग्य तरतुदी करा आणि मग आम्हाला सरपंच बनवा, आयोगाच्या चुकीचा फटका आमच्या कार्यकाळाला का? कुठल्या अधिकाराने, असा संतप्त सवाल टेंब्रुसोंडा येथील सरपंच उर्मीला दहीकर यांनी प्रशासनाला केला आहे. रिक्त जागा वर्षभर उमेदवार न भेटले तर आम्हाला पदापासून वंचित ठेवणार का, असा खडा सवाल त्यांनी केला.जनतेमधून थेट सरपंचपदी निवडून आल्यानंतरही पदापासून वंचित ठेवणे हे घटनाबाह्य आहे. आम्ही जनतेमधून थेट निवडून आल्यावर प्रशासनाची चूक अधिकारावर गदा आणणारी आहे. मग प्रमाणपत्रच पर घ्या.- उर्मीला दहीकर, सरपंच,टेंब्रुसोंडा, ता. चिखलदरा