शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांना तुरुंगात डांबले अजित पवारांना का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:30 IST

राज्यात सिंचन घोटाळा झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली. कमजोर असलेल्या छगन भुजबळांना तुरुंगात डांबण्यात आले. हा सर्व प्रकार ‘साहेबां’च्या आदेशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, असा घणाघात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी येथे केला.

ठळक मुद्देअसदुद्दीन ओवैसी यांचा सवाल : सिंचन घोटाळ्यावर भाजपकडून पडदा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात सिंचन घोटाळा झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली. कमजोर असलेल्या छगन भुजबळांना तुरुंगात डांबण्यात आले. हा सर्व प्रकार ‘साहेबां’च्या आदेशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, असा घणाघात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी येथे केला.अमरावती लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या प्रचारार्थ खासदार ओवैसी यांची येथे जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. भाजप-सेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या सर्व पक्षांचा एक क्लब असून, त्याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आम्ही गरीब, सामान्य, शेतकरी, कष्टकरी, वंचितांसाठी आता वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र क्लब बनवित असल्याची ग्वाही त्यांनी दिली.अजित पवार यांना सिंचन प्रकल्पाच्या घोटाळ्यातून पुरेपूर वाचवण्यात आले. त्याऐवजी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना बळीचा बकरा बनविण्यात आले. हैद्राबादी म्हणीनुसार ‘चोरा चोरा करके गावां बाट लिया’ असे भाजप आणि शरद पवार यांचे राजकीय सख्य आहे. त्यामुळे आता ‘चौकीदार’, ‘साहेबां’ना सोडा अन् प्रकाश आंबेडकरांना साथ द्या, अशी हाक ओवैसी यांनी मतदारांना दिली.मोदींमुळे राज्यघटना असुरक्षितपाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी मोठी आश्वासने केंद्रात सत्ता स्थापन केली. आता जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. यंदा निवडणुकीत मोदी यांनी हिंदू-मुस्लिम वाद प्रचारात आणल्याने देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाही धोक्यात आली असून, राज्यघटना असुरक्षित आहे, असे ओवैसी म्हणाले. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मार्गदर्शन केले.उद्धव ठाकरे ‘भिगी बिल्ली’शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपाविरुद्ध रान पेटविले. ‘चौकीदार चोर है’ म्हणत मोदींना लक्ष्य केले. मात्र, लोकसभा निवडणूक लागताच आता ‘चौकीदार जिंदाबाद’चे नारे लावले जात आहे. असे काय घडले, मोदी, शहांच्या डरकाळीने ठाकरे हे १०० मीटरच्या गतीने धावत गेले आणि भाजपसोबत युती केली, असा प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केला.