शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

वडाळीतील अवैध दारु विक्री थांबविणार कोण?

By admin | Updated: December 20, 2014 00:08 IST

वडाळी येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाला कायम हद्दपार करण्यासाठी आंदोलक महिलांना १० महिन्यांनंतर यश मिळाले.

अमरावती : वडाळी येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाला कायम हद्दपार करण्यासाठी आंदोलक महिलांना १० महिन्यांनंतर यश मिळाले. मात्र, परिसरातील काही भागात सुरु असलेल्या अवैध देशी आणि गावठी दारुविक्रीला कोण थांबविणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे. वडाळी परिसर दारुमुक्त करण्याचा निर्धार महिलांनी केला असून आता अवैध दारुविक्रीला लगाम लावण्यासाठी पोलिसांवर दबावतंत्र निर्माण केले जाणार असल्याची माहिती आहे.वडाळीतील काही भागात दोन, चार घरे सोडून राजरोसपणे अवैध दारु विक्री होते. खरे तर अवैध दारुविक्री रोखण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांचे आहे. मात्र, गत १० महिन्यांपासून येथील देशी दारु विक्रीचे दुकान बंद असल्याचा अवैध दारु विक्रेत्यांनी पुरेपूर लाभ घेतला. परिसरात या काळात मोठ्या प्रमाणात गावठी दारुविक्री सुरू झाली आहे. महिलांनी धनाढ्य शक्तीविरुद्ध लढा देऊन देशी दारुविक्रीचे दुकान बंद करुन इतिहास रचला. परंतु आता त्यांना वडाळी येथे सुरु असलेल्या गावठी दारुविक्रेत्यांविरुद्ध नव्याने लढा पुकारावा लागणार आहे. या लढाईत वडाळीतील महिलांना स्वकीयांसोबत दोन हात करावे लागतील. परिसरातील प्रबुद्धनगर, परिवारपुरा व शिख मोहल्ला भागात मोठ्या प्रमाणात अवैध देशीआणि गावठी दारु विक्रीचे थैमान सुरू आहे. या भागात होत असलेल्या अवैध दारु विक्रीची इंत्यभूत माहिती पोलिसांनी आहे. कोणत्या घरी, कोण अवैध दारु विक्री करतात, याची बारीकसारीक माहिती पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. मात्र चिरिमीरी करुन सुरु असलेली अवैध दारु विक्री थांबविण्यासाठी पोलीस स्वत: पुढाकार घेणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. वडाळीत अवैधरित्या विकल्या जाणारी दारु बंद केली तर अतिरिक्त कमाईवर लगाम लागेल? त्यापेक्षा तक्रार येत नाही तोपर्यंत अवैध दारु विक्री सुरु ठेवून पोलीसही मूकपणे हे सर्व बघतील, यात कोणतीही शंका नाही. न्यायालयात प्रकरण असताना प्रशासनाला जेरीस आणले. असे असताना पोलिसांनी वडाळीत अवैध दारु विक्रीचा वाद उफाळण्यापुर्वीच कारवाई करुन दारु विक्रीला कायम लगाम लावले तर बरे होईल, अन्यथा ज्या अवैध दारु विक्रेत्यांकडून पैसे वसुलीकरण्यासाठी पोलिस जातात त्यांच्यावर हल्ले होण्याची दाट शक्यता आहे.