शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपणार कोण ?

By admin | Updated: March 29, 2016 00:04 IST

काकडा-अंजनगाव सुर्जी मार्गावर आठ किलोमीटर अंतरावरील वडनेर भूजंग हे महानुभाव पंथीयांचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.

वडनेर भूजंग येथील घटना : आश्रमातील अत्याचार प्रकरणअंजनगाव सुर्जी : काकडा-अंजनगाव सुर्जी मार्गावर आठ किलोमीटर अंतरावरील वडनेर भूजंग हे महानुभाव पंथीयांचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. ८०० वर्षांपूर्वी येथील श्रीदत्त मंदिरात श्री चक्रधर स्वामी मुक्कामी थांबले आणि त्यांनी सर्पांचे भांडण मिटविल्याची कथा ‘लीळाचरित्र’ या ग्रंथात आहे. यामुळे येथे वर्षभर अनुयायांची वर्दळ असते. अशा पवित्रस्थळी जर एखाद्या महिलेचा उपमर्द होत असेल तर हे जपणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मानसिक रोगी व भ्रमिष्ट व्यक्तीच्या व्याधी येथील वास्तव्याने नष्ट होतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने येथे अनेकजण येतात. पण, तीर्थस्थळाचा कोणताच दर्जा मिळालेला नसल्याने येथे शासनामार्फत बांधलेली कोणतीच वास्तू नाही. पंथांच्या मुनी-महंतांचे देवदत्त आश्रम, चक्रपाणी आश्रम, आनंदेश्वर आश्रम व इतर लहान-मोठे आश्रम आहेत. तेथेच भक्तांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जाते.मागील बुधवारी येथील देवदत्त आश्रमात महिलेवरील अत्याचाराचे मोठे प्रकरण उघडकीस आले. आश्रमप्रमुख दिगंबर मुनींच्या एका नातलगाने येथीलच एका निवासी मुलीवर महिनाभर केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. तक्रार पथ्रोट पोलिसांना मिळताच लंपट भक्ताला बेड्या ठोकल्या व भादंवि ३७६ चा गुन्हा दाखल केला. इतक्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळाशेजारील आश्रमात महिलेची अशी विटंबना आणि बदनामीकारक प्रकरण होऊनही पंथाच्या कुण्याच मुनी-महंताने अथवा पदाधिकाऱ्याने पुढे येऊन या घटनेचा निषेध केला नाही. गेल्या बुधवारपासून या घटनेबाबत कुठेही वाच्यता झाली नाही. परिणामी येथील महिला भक्तांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.पाच वर्षांपूर्वी येथील आश्रमातील निवासी भक्त महिलेस एकाने पळवून नेले होते. त्याला बुलडाणा जिल्ह्यातील जाळीचा देव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण, बदनामीपोटी महिलेच्या कुटुंबाने महिला हरविल्याची तक्रार पथ्रोट ठाण्यात दाखल केली होती. आश्रमात गुन्हेगारी तत्त्वांना थारा न देणे आणि येथील महिलांच्या सुरक्षेची काळजी घेणे, ही येथील प्रमुखांची जबाबदारी आहे. जेणेकरून या मंदिराचे पावित्र्य अबाधित राहील. घटनेचा निषेध करण्यासाठी मौन सोडून पुढे येणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)