शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडितांच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी कुणाची?

By admin | Updated: November 30, 2015 00:31 IST

जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाचा आपसात समन्वय नसल्याने बलात्कार पीडितांच्या वैद्यकीय तपासणीचा प्रश्न अधांतरी असल्याचे चित्र आहे.

हेळसांड : इर्विन-डफरीन प्रशासनात समन्वयाचा अभाव अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाचा आपसात समन्वय नसल्याने बलात्कार पीडितांच्या वैद्यकीय तपासणीचा प्रश्न अधांतरी असल्याचे चित्र आहे. शनिवारी अंजनगाव सुर्जी येथील एका बलात्कार प्रकरणात महिला पोलिसाने पीडितेला वैद्यकीय तपासणीकरिता अमरावतीला आणले होते. मात्र, दोन्ही रूग्णालयांनी वैद्यकीय तपासणीची जबाबदारी झटकली. कितीतरी वेळ पीडित महिलेच हेळसांड होत राहिली. अंजनगाव सुर्जी येथे एका ४० वर्षीय महिलेवर तिच्या भाच्याने बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. तेथील महिला पोलीस उज्ज्वला खैरकर यांनी शनिवारी सायंकाळी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले होते. मात्र, इर्विन प्रशासनाने पोलिसांना जिल्हा स्त्री रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तेथेही पोलिसांची बोळवण करण्यात आली. पोलिसांनी महिलेला पुन्हा इर्विनमध्ये आणले. मात्र, येथेही महिलेची तपासणी झाली नाही. दोन्ही शासकीय रूग्णालयांनी ही जबाबदारी नाकारल्याने महिला पोलीस व पीडित महिला चितांग्रस्त झाली होती. महिला पोलिसाने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रविवारी सकाळी वैद्यकीय तपासणी करण्याचे आश्वासन महिला पोलिसाला देण्यात आले. त्यामुळे पीडितेहसह महिला पोलिसालाही इर्विनमध्येच रात्र काढली. मात्र, सकाळी पुन्हा दोन्ही रुग्णालयांनी वैद्यकीय तपासणीबाबत टाळाटाळ केली. या प्रकारामुळे महिला पोलीस रुग्णालय प्रशासनासमोर हतबल झाल्याचे विचित्र चित्र दिसून आले. वैद्यकीय तपासणीची जबाबदारी दोन्ही शासकीय रुग्णालयांचीबलात्काराच्या गुन्ह्यातील आरोेपी पुरुषाच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी इर्विन रुग्णालयाकडे आहे तर पीडितांच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी डफरीन रुग्णालयावर आहे. मात्र, मध्यतंरी आरोग्य सहसंचालक अर्चना पाटील यांनी वैद्यकीय तपासणीबाबत केलेल्या फेरबदलांची माहिती दोन्ही रुग्णालयांना पत्राद्वारे दिली होती. ज्या रुग्णालयात गायनाकोलॉजिस्ट आहेत, त्यांनी वैद्यकीय तपासणी करावी, असे त्यात नमुद होते. मात्र, दोन्ही रुग्णालये ही जबाबदारी नाकारत आहेत. बलात्कारित महिलांच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे आहे. तेथे गायनोकॉलॉजीस्ट असल्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. - अरुण यादव, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय. डफरीन रुग्णालयात वर्कलोड असल्यामुळे बलात्कार पीडितांना तपासणीसाठी इर्विनमध्ये पाठविले जाते. सध्या पीडितांच्या वैद्यकीय तपासणीच्या प्रक्रियेत गुंता निर्माण झाला आहे. या समस्येवर लवकरच तोडगा काढू- अरुण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक