शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राणा लँड माफिया तर प्रवीण पोटे कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:18 IST

राज्याचे उद्योग राज्यमंत्री असताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आतापर्यंत काय प्रयत्न केले, हे त्यांनी दाखवावे; समोर यावे. रवि राणांवर जर लँडमाफियाचा आरोप करीत आहात, तर पालकमंत्री कोण आहेत, असा सवाल विजय मिलच्या कामगार कृती समितीने बुधवारी पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देपत्रपरिषद : विजय मिल कृती समिती पदाधिकाऱ्यांचा सवाल

अमरावती : राज्याचे उद्योग राज्यमंत्री असताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आतापर्यंत काय प्रयत्न केले, हे त्यांनी दाखवावे; समोर यावे. रवि राणांवर जर लँडमाफियाचा आरोप करीत आहात, तर पालकमंत्री कोण आहेत, असा सवाल विजय मिलच्या कामगार कृती समितीने बुधवारी पत्रपरिषदेत केला.उद्योग राज्यमंत्री पोटे यांनी या ठिकाणी उद्योग सुरू केल्यास आम्ही सर्व जण त्यांच्या पाठीशी राहू. मात्र, आतापर्यंत त्यांनी काहीही केलेले नाही. नांदगावच्या भारत डायनामिक्स या कारखान्याविषयीच्या बातम्या आज वाचण्यात आल्यात. विजय मिलच्या जागेत उद्योग उभा राहावा, यासाठी २००७ ते आतापर्यंत कोणी प्रयत्न केलेले नाही; आ. राणा यांनी ते सुरू करताच त्यांना विरोध केला जात असल्याचा निषेध कृती समितीने केला. २०१२ ते २०१८ या काळात सातत्याने पाठपुरावा करीत आलो. वस्त्रोद्योग महामंडळाला प्रत्यक्ष भेटलो. येथे उद्योग उभारणीसाठी निविदा काढा, अशी आम्ही मागणी केली. आता अफवा पसरवून धमकावले जात असल्याचा आरोप समितीने केला.विजय मिलच्या जागेवर गारमेंट झोन उभारणीचा आ. राणा यांचा संकल्प आहे. स्थानिक राजकारणी अन् नगरसेवकांचा विरोध आहे. गोरगरिबांची मुले या ठिकाणी असलेल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या भविष्याशी खेळू नये व या ठिकाणी राजकारण आणू नये, असे आवाहन प्राचार्य गोपाल वैराळे यांनी केले. यावेळी सिद्धार्र्थ बनसोड, अजय जयस्वाल, मनोज गजभिये, रामू कातोरे, नितीन सोळंके, विलास वाडेकर, नाना आमले आदी उपस्थित होते.उद्योग आणून दाखवा; पालकमंत्र्यांना आव्हानविजय मिलबाबत पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केल्याचा एक तरी पुरावा दाखवा. आम्ही कामगार कसे जगत आहोत, याची जाण त्यांना आहे का? नांदगावातील उद्योगाच्या भूमिपूजनासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या वाचल्या. उर्वरित सहा महिन्यात मिलच्या जागेवर एक तरी उद्योग आणून दाखवावा, असे आव्हान कृती समितीने दिले.विजय मिलचा सात-बारा शासनाच्याच नावेआजही विजय मिलचा सात-बारा शासनाच्याच नावे आहे. आ. रवि राणा यांच्याकडून जमिनीच्या दुरुपयोगाचा शिवराय कुळकर्णी यांनी केलेला आरोप खोटा आहे. आ. राणांच्या चांगल्या कामाची बदनामी व फुकटात प्रसिद्धीचा डाव खेळण्याऐवजी कुळकर्णी यांनी बडनेरासाठी केलेले काम दाखवावे, असे आव्हान यावेळी देण्यात आले.