शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांचा हत्ती पोसायचा कुणी ?

By admin | Updated: April 16, 2017 00:05 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले सुमारे ६४ किमीचे रस्ते स्वत:कडे हस्तांतरित करवून घेऊन ...

महापालिकेसमोर प्रश्न : देखभाल, दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च प्रदीप भाकरे अमरावतीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले सुमारे ६४ किमीचे रस्ते स्वत:कडे हस्तांतरित करवून घेऊन त्या रस्त्यांच्या देखभाल -दुरुस्तीवर होणारा अवाढव्य खर्च कुठून करायचा, असा यक्षप्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे साबांविभागाकडून रस्ते हस्तांतरणाचा प्रस्ताव आल्यास तो महासभेसमोर ठेवायचा आणि त्यावर साधकबाधक चर्चा घडवून आणण्याच्या मानसिकतेपर्यंत महापालिका प्रशासन पोहोचले आहे. आर्थिक विपन्नावस्थेतून कसेबसे मार्गक्रमण करणाऱ्या महापालिकेला नव्याने कुठलाही भूर्दंड सोसावणार नाही,ही वस्तूस्थितीही सभागृहासमोर प्रशासनाच्या वतीने ठेवली जाण्याचे संकेत आहेत.महापालिकेकडे रस्ते हस्तांतरणाचा निर्णय परमीटरुम, बिअर शॉपी, वाईन शॉपीसाठी दिलासादायक ठरणारा असला तरी ‘ड’ वर्गात असलेल्या अमरावती महापालिकेला तो परवडणारा नाही. शासनाकडून येणाऱ्या अनुदानावर कर्मचाऱ्यांचे वेतन २-३महिन्यांनंतर करणाऱ्या अमरावती महापालिकेला तर तो निर्णय परवडणारा नाही. रस्ते हस्तांतरण करवून घेतल्यास महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा बोझा उचलावा लागेल. सध्या महापालिकेच्या ताब्यातील रस्त्यांची अवस्था जेमतेम आहे. आहे तेच रस्ते दुरुस्त करताना पालिकेच्या नाकीनऊ आले आहे. त्यात नव्याने १३ रस्त्यांची भर पडल्यास महापालिकेला महामार्गाचा हत्ती पोसण्याची कसरत करावी लागेल, हे निश्चित.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गावरील दारुबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. महापालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गामुळे मद्यविक्रेत्यांवर संक्रांत कोसळली आहे. त्यावर उपाय म्हणून मद्याची दुकाने पुन्हा सुरू व्हावीत, यासाठी आता शासनाने शहरातून जाणारे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे धोरण आखले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अमरावती महापालिका क्षेत्रात येणारे राज्यमार्ग हस्तांतरित करण्याबाबत साबांविभागाने पुढाकार घेतला आहे. या आठवड्यात साबांविभागाकडून महापालिकेला अधिकृत प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती आहे.शहरातील ६४.१२ किमीचे १३ रस्ते महापालिका क्षेत्रात असल्याने देखभाल व दुरुस्तीकरिता महापालिकेकडे हस्तांतरित करणे आवश्यक असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावित असलेल्या प्रस्तावात नमूद असेल. महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेले रस्ते हस्तांतरण करण्याबाबत ‘ना हरकत’ देण्यात यावी, जेणेकरून रस्ते अवर्गीकृत आणि हस्तांतरणाचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीकरिता सादर करण्यात येईल, असा प्रस्ताव महापालिकेला दिला जाईल.पर्यायांवर विचारमंथन मद्यापासून मिळणारा ७ हजार कोटींचा महसूल वाचविण्याकरिता सरकारपुढे दोन पर्याय आहेत. नगरपालिका, महापालिकांनी रस्त्यांची मागणी करायची, बांधकाम विभागाच्या शिफारसीसह राज्य सरकारने त्याला मंजुरी द्यायची असा एक पर्याय उपलब्ध आहे. तर राज्य सरकारनेच पुढाकार घेऊन अध्यादेशाद्वारे रस्ते हस्तांतरण करवून घ्यायचे, असा अन्य पर्याय शासनाकडे उपलब्ध असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. दुसऱ्या पर्यायाला आमसभेच्या मान्यतेची आवश्यकता भासणार नाही.पूर्ण काम हस्तांतरित ?सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील महापालिका हद्दीतील या रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जी कामे मंजूर झाली आहेत किंवा प्रगतीपथावरही आहेत, ती सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात येतील. ती पूर्ण कामे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येतील, असा काहीसा प्रस्ताव दिला जाणार आहे.