शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींच्या वाहन घोटाळ्यात लाभार्थी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:31 IST

अग्निशमन विभागाद्वारे २.०४ कोटींच्या मल्टियुटिलिटी वाहन खरेदीमध्ये झालेल्या लाखोंच्या घोटाळ्यातील ‘लाभार्थी’ शोधण्याचे आव्हान महापालिका आयुक्तांसमोर आहे. येत्या आमसभेत सभागृहासमोर चौकशी अहवाल ठेवण्याचे निर्देश सभापतींनी दिले. महापालिका वर्तुळात हे ‘लाभार्थी’ सर्वा$ंनाच माहीत असले तरी आठ लाख अमरावतीकरांचा विश्वास सार्थ ठरण्यासाठी आयुक्त संजय निपाणे यांना या घोटाळ्याचा पर्दाफाश करावा लागेल.

ठळक मुद्देआयुक्त तोडणार का चुप्पी? : आठ लाख नागरिकांना वास्तवदर्शी अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अग्निशमन विभागाद्वारे २.०४ कोटींच्या मल्टियुटिलिटी वाहन खरेदीमध्ये झालेल्या लाखोंच्या घोटाळ्यातील ‘लाभार्थी’ शोधण्याचे आव्हान महापालिका आयुक्तांसमोर आहे. येत्या आमसभेत सभागृहासमोर चौकशी अहवाल ठेवण्याचे निर्देश सभापतींनी दिले. महापालिका वर्तुळात हे ‘लाभार्थी’ सर्वा$ंनाच माहीत असले तरी आठ लाख अमरावतीकरांचा विश्वास सार्थ ठरण्यासाठी आयुक्त संजय निपाणे यांना या घोटाळ्याचा पर्दाफाश करावा लागेल.शनिवारी झालेल्या आमसभेत २.०४ कोटींच्या वाहन घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरून महापालिकेचे वस्त्रहरण झाले. अखेर महापौरांनी या वाहन घोटाळ्याची चौकशी करून यामध्ये झालेल्या अनियमिततेचा वस्तुनिष्ठ अहवाल पुढच्या आमसभेत ठेवण्याचे निर्देश आयुक्तांना दिलेत. त्यामुळे या लाखोंच्या घोटाळ्याचे लाभार्थी सभागृहासमोर ठेवण्याची जबाबदारी आयुक्तांवर आली आहे. यामधील खरे लाभार्थी कोण, हे सर्वांनाच माहीत असल्याने त्यांना क्लीन चिट देणे आयुक्तांना परवडणारे नाही, अन्यथा सभागृहात पुन्हा वस्त्रहरणाचा प्रसंग उद्भवू शकतो. ही अनियमितता कोणी केली, हे फक्त आयुक्तांकडून वदवून घ्यायचे आहे, ही यामागची वस्तुस्थिती आहे. शासननिधीला चुना लावणारे पडद्यामागील कलावंत हुडकून तेदेखील अमरावतीकरांसमोर आणण्याचे कसब आयुक्तांना दाखवावे लागेल.जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीची महापालिकेत वाट लागली. प्रशासकीय नियमांच्या आधारे हा दिवसाढवळ्या घातलेला दरोडाच असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.७५ लाखांचे वाहन २.०४ कोटीत कसे खरेदी केले गेले? किंबहुना स्थायी समितीसह प्रत्येक आमसभेत या वाहन घोटाळ्याने महापालिकेची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची विश्वासार्हता कायम ठेवण्याची नैतिक जबाबदारी आता महापालिका आयुक्तांवर आहे. ते कसोटीवर खरे उतरतात की अनियमिततेवर पांघरून घालतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.स्थायीचे निर्देश डावललेस्थायी समितीचे सदस्य प्रशांत डवरे, ऋषी खत्री आणि अब्दुल नाझीर यांच्या पाठपुराव्याने सभापती विवेक कलोती यांनी चौकशी समिती गठित करण्याचे निर्देश ४ आॅक्टोबर २०१८ रोजी दिले होते. मात्र, प्रशासकीय दबावात त्यावर अंमल झाला नाही. तत्कालीन आयुक्तांनी चौकशीसाठी नेमलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंता अनंत पोतदार यांच्या एक सदस्यीय समितीने चौकशी अहवालच दिला नाही.या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणारवाहन ७५ लाखांचे असतांना २.०४ कोटीत खरेदी कसे केले, याबाबतची खातरजमा केली होती काय, कंपनी कुठली, सध्या तिचे स्टेटस काय आहे, या कंपनीचा पत्ता नेहमी वेगळा का राहतो, टेंडर कशा पद्धतीने मॅनेज झाले, निविदा छाननी समितीचे कर्तव्य काय, त्यांना तपासणीत काय अनियमितता आढळली, कंत्राटदारांची देयके वर्षभर मिळत नसतांना या वाहनासाठी चार दिवसांत पेमेंट कसे दिले, याबाबत फाइलचा प्रवास त्वरेने कसा झाला, कंपनीद्वारे जीएसटीचा भरणा का केलेला नाही, राज्यात कुठल्या महापालिकेत या प्रकारचे वाहनाची खरेदी करण्यात आलेली आहे आदींबाबत आमसभेत वस्त्रहरण झाल्याने या प्रश्नांची उत्तरे आठ लाख अमरावतीकरांना चौकशीत हवी आहेत.महापालिकेकडून दिशाभूलबाजारभावाची शहानिशा न करता हे वाहन खरेदी करण्यात आले. खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करून दोषींचे चेहरे उघड करण्यासाठी नगर विकास मंत्रालय, मानवाधिकार आयोग, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी करण्यात आल्यात. या प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल आयुक्तांना मागण्यात आला. मात्र, या खरेदी अनियमितता झालेली नाही, असा मोघम अहवाल प्रशासनातील उच्च पदस्थांना दिल्याचे वास्तव आहे.