शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

हे श्रीपाल पाल आहेत तरी कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 00:19 IST

जिल्हा परिषदेच्या सभापती वनिता पाल यांचे पती श्रीपाल पाल यांनी नव्या वाहनाच्या मुद्यावरून प्रशासनास वेठीस धरले

सीईओ हे काय ? : ‘महिला राज’ला ‘पतीराज’ने फासला हरताळअमरावती : जिल्हा परिषदेच्या सभापती वनिता पाल यांचे पती श्रीपाल पाल यांनी नव्या वाहनाच्या मुद्यावरून प्रशासनास वेठीस धरले आणि आश्चर्य असे की, एका अधिकाऱ्याचे नवे वाहनही त्यांना देण्यात आले. मुद्दा असा उपस्थित होतो की हे श्रीपाल पाल आहेत तरी कोण? जिल्हा परिषदेत ३ एप्रिल रोजी विषय समितीच्या सभपतीपदाच्या निवडणुका पार पडल्यात. या निवडणुकीत काँग्रेसच्या वनिता पाल यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली. ज्या दिवशी त्यांची बहुमताने या पदावर निवड झाली, त्याच दिवसापासून त्यांना पदाधिकारी या नात्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून नियमानुसार शासकीय सोई सुविधा उपलब्ध करून दिल्यात. यानुसारच आतापर्यंत महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या दिमतीला असलेले शासकीय वाहन (क्रमांक एमएच २७ अ‍ेअ‍े २१) हेदेखील सेवेत रूजू केले; तथपि सभापतींचे पती श्रीपाल पाल यांची नजर प्रशासनाच्या नव्या वाहनावर होती. त्यांनी नवीन वाहनासाठी सामान्य प्रशासनाचे उपकार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे यांच्याकडे मागणी केली. मात्र नियमानुसार जे वाहन सभापतींच्या नावाने आहे तेच मिळेल, दुसरे वाहन देता येत नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाच्या वतीने तट्टे यांनी मांडली. महिला व बालकल्याण समिती सभापतींचा मतदारसंघ आणि गाव मेळघाटात असल्याचे कारण सांगून श्रीपाल पाल यांनी नव्या वाहनाचा अट्टाहास सोडला नाही. त्यांनी यासाठी सीईओंनाही गळ घातली. परंतु व्यर्थ! त्यानंतर श्रीपाल पाल यांनी वाहनाचा विषय प्रतिष्ठेचा केला. सभापती असलेल्या त्यांच्या पत्नीला बाजूला सारून स्वत:च प्रशासनावर दबाबतंत्राचा वापर सुरू केला. नवे वाहन हवेच, असे सांगून देणार नसाल तर पायदळ जाऊ अशी धमकीच यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिली. अखेर प्रशासन श्रीपाल पाल यांच्यासमोर तुकले. अधिकाऱ्याचे नवे वाहन देत असल्याचे श्रीपाल पाल यांना सांगण्यात आले. ‘महिला राज"ला बळकटी मिळावी यासाठी स्थानिक स्वराज्य संसस्थांमध्ये जी ५० टक्के महिला आरक्षणाची तरतूद करण्यात आली त्यालाच जिल्हा परिषदेतील "पतीराज"मुळे हरताळ फासला गेला. उत्तम प्रशासकीय कार्यप्रणालीसाठी आग्रही असलेल्या मुख्य कर्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी यांनी त्रयस्थ इसमाचा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप खपवून घेतलाच कसा, असा सवाल आता निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)