शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘गोड विष’ विक्रीला अभय कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 21:59 IST

तालुक्यात सर्वत्र भेसळयुक्त कुंदा वपरून खवा व पेढे विक्री व्यवसायच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. सामान्य नागरिकांसाठी ही मिठाई ‘गोड विष’ ठरत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून, संबंधित अधिकाऱ्यांसाठी हे चिरीमिरीचे साधन बनत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.

ठळक मुद्देखव्यात भेसळ : अन्न व औषध प्रशासनाच्या खाबुगिरीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात सर्वत्र भेसळयुक्त कुंदा वपरून खवा व पेढे विक्री व्यवसायच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. सामान्य नागरिकांसाठी ही मिठाई ‘गोड विष’ ठरत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून, संबंधित अधिकाऱ्यांसाठी हे चिरीमिरीचे साधन बनत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.पेढे, मिठाई तयार करण्याकरिता मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त कुंदाचा वापर होत असल्याचे सत्य 'लोकमत'ने समोर आणताच तालुक्यातील काही स्वीट मार्ट संचालकांचे धाबे दणाणले. कुंद्यात मानवी आरोग्याला अपायकारक पदार्थ मिसळून तयार केलेल्या मिठाईची राजरोस विक्री केली जाते. याबाबत अन्न व औषध प्रशासन मूकदर्शक बनले आहे.हॉटेल, मिठाई दुकानदार, स्वीटमार्ट संचालकांचे परवाना नूतनीकरण करण्यापुरतेच काम अन्न व औषध प्रशासन करीत असते. मिठाई दुकानाची, पदार्थांची नमुने तपासणी यांची जबाबदारी या विभागाकडे आहे; मात्र, वैयक्तिक लाभापोटी पठाणी वसुली करून अन्न व औषध प्रशासन, पुरवठा अधिकारी व नगरपालिकेचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहेत.नगरपालिका हद्दीत सर्वाधिक मिठाई दुकाने आहेत. आरोग्य कराच्या नावावर पालिका दरवर्षी लाखोंची वसुली करीत असली तरी नागरिकांच्या आरोग्याविषयी संबंधित विभाग कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.स्वीटमार्टच्या माध्यमातून आरोग्यास हानिकारक अशी मिठाईची शहरात विक्री होत आहे. संबंधित विभाग याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे.- किशोर देशमुख,नागरिकभेसळयुक्त मिठाईच्या सेवनाने पोटातील विकार, आतड्यांचे रोग तसेच कॅन्सरसारखे आजार होण्याची दाट शक्यता असते.- हेमंत रावळे,वैद्यकीय व्यावसायिक