शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे सोने @ ९००० पार; शेतकऱ्यांकडे कापूस आहे तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 23:54 IST

परिसरात कापूस व सोयाबीन ही कॅश क्रॉप आहेत.  शेतकऱ्यांची  याच पिकांवर मुख्य   मदार असते. पिके वाढीच्या अवस्थेत असताना  परिसरात  ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली. याशिवाय ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, शेतात पाणी साचले होते,  पिकांची वाढ खुंटली. कपाशी पिवळी पडली. कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात कमी आलेली आहे.

किशोर मोकलकरलोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : सध्या शिवारात  कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. या पांढऱ्या सोन्याला खेडा खरेदीत सध्या नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी उतारा घटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जानेवारीपश्चात भाववाढीची शक्यता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.         मागच्या हंगामात आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला होता. त्यामुळेच  यंदा कपाशीची क्षेत्रवाढ झाली. मात्र,  अतिवृष्टीचा फटका  बसल्याने कापसाच्या उताऱ्यात ५० ते ६० टक्क्यांनी घट येत आहे. उत्पादन घटल्याने ‘कही खुशी, कही गम’ अशी उत्पादकांची अवस्था झाली आहे.       परिसरात कापूस व सोयाबीन ही कॅश क्रॉप आहेत.  शेतकऱ्यांची  याच पिकांवर मुख्य   मदार असते. पिके वाढीच्या अवस्थेत असताना  परिसरात  ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली. याशिवाय ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, शेतात पाणी साचले होते,  पिकांची वाढ खुंटली. कपाशी पिवळी पडली. कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात कमी आलेली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर  कापूस वेचणीला सुरुवात झाली, परंतु, कापसाचा उतारा एकरी दोन ते तीन क्विंटल कापूस निघाला. अनेक गावांत पावसाने नुकसान होऊन त्या गावांना शासन मदत मिळाली नाही.

उतारा घटला, आवक वाढेनाजिल्ह्याच्या काही भागात कुठे सीतादई होत आहे. बोंडअळीने बोंड खराब झाले आहे. वेचणी दहा रुपये किलोवर गेली, तरीही मजूर मिळत नाही, काही भागात दोन वेच्यात उलंगवाडी होण्याची शक्यता आहे. दरवाढ होत असतांना शेतकऱ्यांच्या घरात कापूस नाही,  खेडा खरेदीत लूट सुरुच आहे.

शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले, शासन मदत मिळावीप्रमुख पिकांचे अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले. बियाणे, लागवड, फवारणी, वेचणीचा खर्च बघता उत्पादन खर्चदेखील निघणार नाही. परिणामी , शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट यंदा कोलमडले आहे. त्यामुळे पावसाच्या नुकसानीसाठी शासनाने मदत निधी उपलब्ध करावा व सरसकट पीक विम्याचा लाभ मिळावा, असे विरुळ पूर्णा येथील शेतकरी सुमीत बोबडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

या आठवड्यात सीतादई झाली, पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यात बोंडअळीनेही नुकसान केले. वेचणीही वाढली, खेडा खरेदीत दर वाढले तरीही शेतकऱ्यांकडे कापूस नाही. मोठी विवंचना ठाकली आहे.- रावसाहेब खंडारे, शेतकरी

 

 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती