शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

श्वानांना पांढऱ्या-काळ्या रंगांचीच ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:36 IST

श्वानांना केवळ पांढरा व काळा या दोन रंगांचीच जाण असते. त्यांना लाल रंग कळतच नाही. त्यामुळे घरासमोरील फाटकावर लाल पाण्याची बॉटल लटकविण्याचा प्रकार हा मूर्खपणाचा कळस आहे. गैरसमजातून असले प्रकार नागरिक करीत असल्याचा दावा प्राणिप्रेमींनी केला आहे.

ठळक मुद्देप्राणिप्रेमींचा दावा : लाल पाण्याची बॉटल लटकविणे हा मूर्खपणाचा कळस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्वानांना केवळ पांढरा व काळा या दोन रंगांचीच जाण असते. त्यांना लाल रंग कळतच नाही. त्यामुळे घरासमोरील फाटकावर लाल पाण्याची बॉटल लटकविण्याचा प्रकार हा मूर्खपणाचा कळस आहे. गैरसमजातून असले प्रकार नागरिक करीत असल्याचा दावा प्राणिप्रेमींनी केला आहे. शहरातील अनेक घरासमोर लाल पाण्याची बॉटल लटकविली असतानाही तेथे श्वान ठाण मांडून बसतात. तेथे घाण करून ठेवतात, असे आढळून आले आहे.पावसाळ्यात श्वान घरासमोरील दाराशी बसून घाण करीत असल्यामुळे अनेक नागरिक फाटकावर कुंकु मिश्रित लाल पाण्याची बॉटल लटकवित आहेत. या प्रकाराबाबत पशुचिकित्सकांचे मत जाणून घेतले असता, श्वानांना केवळ काळा व पांढरा रंग असे दोनच रंग कळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लाल पाणी पाहून श्वान थांबत नसल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये पसरला कसा, याबाबत प्राणिप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पावसाळा हा श्वानांच्या मीलनाचा काळ असतो. त्यामुळे मादी श्वानांचा मागोवा घेत गल्लीबोळात ते फिरत असतात. मादी ज्या ठिकाणी थांबते, त्याच ठिकाणी श्वान गर्दी करतात. अशावेळी श्वान तेथेच घाण करून ठेवतात. मात्र, श्वानांनी घाण करू नये, यासाठी अशिक्षित व सुशिक्षित नागरिकांनी एकाच पातळीवर येऊन लाल पाण्याचा प्रयोग केला आहे. अंधानुकरणातून हा प्रकार शहरभर पसरला. अनेकांनी आपआपल्या घरासमोर लाल पाण्याची बॉटल लकटवून ठेवली आहे. मात्र, लाल पाणी बॉटल असतानाही तेथे श्वान बसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे लाल पाण्याचा श्वानांवर काही परिणाम होत नसल्याचे आढळून आले आहे.श्वानांना पांढरा व काळा रंगच ओळखता येतो. त्यांना लाल रंगाविषयी कळतच नाही, तर ते लाल पाण्याला भिणार तरी कसे? नागरिकांनी उगाचच लाल पाणी घरासमोर लकटविण्याचा गैरसमज करून घेतलेला आहे.- शुभम सांयके, प्राणिप्रेमी.

टॅग्स :dogकुत्रा