शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत माहिती देताना विद्यार्थ्यांना आधारकार्डची सक्ती नाही

By admin | Updated: August 3, 2015 00:06 IST

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ‘सरल’ योजनेंतर्गत भरण्यात येणाऱ्या आॅनलाईन माहितीसाठी शालेय ...

प्रधान सचिवांचे निर्देश : शिक्षणाधिकाऱ्यांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संवादअमरावती : शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ‘सरल’ योजनेंतर्गत भरण्यात येणाऱ्या आॅनलाईन माहितीसाठी शालेय विद्यार्थ्यांचा रक्तगट व आधार क्रमांकाची माहिती देणे अनिवार्य नसल्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांशी ‘व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे बोलताना स्पष्ट केले.‘सरल’ योजनेमध्ये भरण्यात येणाऱ्या आॅनलाईन माहितीमध्ये रक्तगट तसेच आधार क्रमांकाची माहिती देणे अनिवार्य असल्याचे सांगत अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना याविषयीच्या माहितीची सक्ती केली होती. याविषयीचे वृत्त प्रकाशित होताच रक्तगटाची माहिती सक्तीची नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. यानंतर आधारकार्डाचीही सक्ती नसल्याची बाब शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी गुरूवारी ‘व्हिसी’द्वारे स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रत्येक मान्यताप्राप्त शाळा, त्या शाळेमध्ये कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ‘सरल’ प्रणालीद्वारे आॅनलाईन भरण्याचे काम प्रत्येक शाळेत सुरू आहे यामुळे प्रत्येक संस्था, शिक्षक व विद्यार्थी यांची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. या अर्जामध्ये असलेल्या जवळपास ९० रकान्यांपैकी केवळ १५ मुद्याचीच माहिती भरणे अपेक्षित आहे. उर्वरित माहिती विद्यार्थ्यांच्या दाखल खारीज रजिस्टरमध्ये आधीच समाविष्ट असल्याने सहज उपलब्ध आहे. या माहितीसोबतच रक्तगट व आधार कार्डची माहिती सरल प्रक्रियेत विचारली आहे त्यामुळे अनेक शाळांनी रक्तगट तपासणी व आधार कार्डची सक्ती करून विद्यार्थ्यांना व पालकांना वेठीस धरले होते. रक्तगट लिहिणे ऐच्छिक असल्याचे समोर आल्यावर व त्याच दरम्यान शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भापकर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प समन्वयक शिंदे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला. आधारकार्डची सक्ती नको असल्यास माहिती भरा, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. यामुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)बचत खात्याची माहिती ऐच्छिकजे विद्यार्थी शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता किंवा इतर आर्थिक सवलतीसाठी पात्र आहेत. अशाच विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती सरल प्रक्रियेत देणे अपेक्षित आहे. जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल, जे विद्यार्थी अशा सवलती किंवा आर्थिक लाभासाठी पात्र नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती देणेसुद्धा सक्तीचे नाही. त्यामुळे शाळांनी सरसकट विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची गरज नाही.