शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र भुयारला निरोप देताना गहिवरले शेतकरी

By admin | Updated: November 7, 2016 00:21 IST

पंचायत समिती टेंभुरखेडा गणाचे सदस्य तथा युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता लढून ....

खामगावला रवानगी : शहीद स्मृती स्तंभाला नमन वरूड : पंचायत समिती टेंभुरखेडा गणाचे सदस्य तथा युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता लढून त्यांना न्याय मिळून दिला. परंतु याचे बक्षीस म्हणून प्रशासनाने त्यांना तडीपारीची शिक्षा दिली. उपविभागीय अधिकारी मोर्शी यांनी जिल्ह्यातून योग्य त्या मार्गाने जाण्याचा आदेश दिला. आदेशाचे पालन करीत देवेंद्र भुयार हे बेनोडा येथील शहीद स्मृती स्तंभाला नमन करून जिल्हा सोडला. यावेळी हजारो शेतकरी उपस्थित होते.पंचायत समिती वरुडचे टेंभुरखेडा गणातून निवडून आलेले पंचायत समिती सदस्य तसेच युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी संत्रा, कपाशीपासून तर कृषीमालाला भाव देणे आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता वेळोवेळी शासनाला वेठीस धरून आंदोलने केलीत. परंतु आंदोलने करीत असताना पोलीस प्रशानाने गुन्हे दाखल करून तसा अहवाल उपविभागीय अधिकारी मोर्शी यांच्याकडे सादर करून तडीपारीचा प्रस्ताव पाठवून शिफारस केली होती. यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ख) अन्वये त्यांना तडीपार केले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत देवेंद्र भुयार यांनी ५ नोव्हेंबर रोजी शहिदांच्या स्मृतीला अभिवादन करून जिल्हा सोडला. यावेळी तालुक्यातील हजारो शेतकरी, संघटनेचे हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, आदिवासी उपस्थित होते. बेनोड्याचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी भुयार यांना पोलीस सरंक्षणात एसटीत बसवून दिले. कुण्या नेत्याविरुद्ध तडीपारीचे आदेश काढण्याची ही तालुक्यातील पहिली घटना आहे. (तालुका प्रतिनिधी)कष्टकऱ्यांकरिता चळवळ सुरुच ठेवू प्रशासनाने माझ्याविरुद्ध कितीही कारवाया केल्या आणि तडीपार केले तरी शेतकऱ्यांकरिता एक कार्यकर्ता म्हणून मी उभी केलेली चळवळ अखंड सुरू ठेवणार आहे. माझ्याविरुद्ध कटकारस्थान रचून गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न हाणून पाडू. मी निर्दोष सिद्ध होणार याची मला खात्री आहे. माझ्या अनुपस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका. कष्टकऱ्यांची चळवळ सुरूच ठेवा, असे आवाहन यावेळी भुयार यांनी उपस्थितांना केले.