शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन खर्चानुसार हमीभाव कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:01 IST

हमीभावाच्या शासन खरेदीत अटी अन् शर्ती भरणा आहे, तर खासगीत एकाही शेतमालास हमीभाव मिळालेला नाही. बाजार समित्यांमध्ये हमीभावाने शेतमालाची खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांनी सर्वांनीच दिले आहे. मात्र, एकाही व्यापाऱ्याविरुद्ध कारवाई नाही. त्यामुळेच व्यापाऱ्यांचे फावते व शेतकऱ्यांचा माल निघताच भाव पडतात.

ठळक मुद्दे‘एमएसपी’मध्ये शेतकऱ्यांची थट्टा : क्विंटलमागे कापसाला २६० , मूग १४६, सोयाबीनला १७० रुपयांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘लॉकडाऊन’च्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना किमान यंदा तरी केंद्र सरकार उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देईल, ही आशा वांझोटी ठरली. शेतीपिकांचा उत्पादन खर्च कित्येक पटींनी वाढला असताना हमीभाव जाहीर करताना केंद्र शासनाने शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. दोन दिवसांपूर्वी जाहीर हमीभावामध्ये क्विंटलमागे कापसाला २६०, मुगाला १४६, सोयाबीनला १७० व तुरीला २०० रुपये वाढ देऊन थट्टा केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.हमीभावाच्या शासन खरेदीत अटी अन् शर्ती भरणा आहे, तर खासगीत एकाही शेतमालास हमीभाव मिळालेला नाही. बाजार समित्यांमध्ये हमीभावाने शेतमालाची खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांनी सर्वांनीच दिले आहे. मात्र, एकाही व्यापाऱ्याविरुद्ध कारवाई नाही. त्यामुळेच व्यापाऱ्यांचे फावते व शेतकऱ्यांचा माल निघताच भाव पडतात.सध्या सर्वच शेतमाल हमीभावाच्या आत विकला जात आहे. हमीभावाची अंमलबजावणी कुठेही होत नाही. बाजार समित्यांनीदेखील नियम, कायदे, अधिनियम व परिपत्रक हे बासनात बांधून ठेवले आहेत. सहकार विभागानेदेखील एकाही बाजार समितीवर किंवा व्यापाऱ्यावर कारवाई केली नसल्याचे हमीभावात तुटपुंजी वाढ झाली तरी त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नसल्याचे वास्तव आहे.राज्याने शिफारस केलेल्या दराच्या तुलनेत ४० टके कपात करुन केंद्र शासनाने यंदाचे हमीभाव जाहीर केल्याचा आरोप आता होत आहे. यामध्ये उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा कुठे? यंदाचे हमीभाव म्हणजे केंद्र शासनाच्या आश्वासनानंतर निव्वळ धूळफेक आहे. यामुळे सन २०२२ पर्यत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार कसे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.सोयाबीन हंगामात व्यापाऱ्यांनी भाव पाडताच शासन खरेदी केंदे्र सुरू केली जातात. या ठिकाणी पहिली अडचण ही ग्रेडरचीच असते. ती निकाली निघाली, तर मालास चाळणी व नंतर आर्द्रता जास्त असल्याचे सांगूण बोळवण हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे माल परत नेऊन वाहतूक खर्चाचा दुप्पट भुर्दंड बसल्यापेक्षा शेतकरी व्यापाऱ्यांना मातीमोल भावाने शेतमाल विकतात. बारदाना नाही, गोडाऊन नाही आदी कारणे ही नित्याचीच आहे. एवढे झाल्यावर माल विकला गेल्यास किमान चार-सहा महिने चुकारे नाहीत. त्यामुळे शासन खरेदी केंद्र म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाली आहेत.सद्यस्थितीत कापसाची दैनाजिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. कपाशी बियाणे, खते, कीटकनाशके, पेरणी, मशागत, निंदण, खुरपण, काढणी, सोंगणी ते बाजारपेठ आदी प्रत्येक बाबीमध्ये कित्येक पटींनी वाढ झालेली आहे. दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील निघालेला नाही. त्याच्या तुलनेत हमीभावात वाढ नाही, खासगीत भाव नाही. लॉकडाऊनमुळे नोंदणी केलेल्या १९ हजार शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडून आहे. शेतकºयाने आता पेरणीपूर्व मशागत करावी की केंद्रावर चकरा माराव्यात, हा प्रश्न निर्माण झाला आहे.गतवर्षीच्या तुलनेत फक्त ३ ते ५ टक्केच वाढ करण्यात आली आहे. केंद्र शासनाद्वारे निव्वळ घोषणाबाजी सुरू आहे. जगात मंदी असताना हमीभावाच्या आत शेतमाल आयात होणार नाही, याची दक्षता महत्त्वाची आहे. हमीभावाच्या आत कुठलाही सौदा होणार नाही, याविषयी कायद्याची अंमलबजावणी केव्हा करणार?- विजय जावंधियाशेतकरी नेते

टॅग्स :cottonकापूस