शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्री संवर्धन राखीव क्षेत्राचे घोडे अडले कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST

तीन महिन्यानंतर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश : अभयारण्याचा प्रस्ताव बारगळला वरूड : तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या महेंद्री जंगलाला अभयारण्याचा ...

तीन महिन्यानंतर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश : अभयारण्याचा प्रस्ताव बारगळला

वरूड : तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या महेंद्री जंगलाला अभयारण्याचा दर्जा न देता ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ घोषित करण्यात आले. तसा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र, त्या निर्णयाला तीन महिने होत असताना प्रत्यक्षात कुठल्याही कामास सुरुवात झालेली नाही. मंत्रिमंडळ निर्णयानुसार आता कुठे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश वनविभागाला मिळाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची नागपूर येथे ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या बैठकीत महेंद्री अभयारण्य जाहीर करून त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश वनविभागाला दिले होते. यामुळे वरूड तालुक्याच्या वैभवात भर पडून पर्यटक वाढतील, असा उद्देश होता. परंतु, राजकीय आणि ग्रामस्थांचा दबाव वाढत असल्याने अभयारण्याऐवजी महेंद्री जंगल ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ घोषित करून तसा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश वनविभागाला देण्यात आले होते. परंतु, तीन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा प्रत्यक्ष कामाला सुरुवात नसल्याने महेंद्री संरक्षित जंगलाचे घोडे कुठे अडले, हे गुलदस्त्यात आहे. महेंद्री अभयारण्याला ग्रामस्थांसोबतच राजकीय विरोधाची बाधा नडल्याची वस्तुस्थिती कुणीही नाकारणार नाही. मात्र, संरक्षित जंगल क्षेत्र म्हणजे नेमके काय, ते केल्याने महेंद्री जंगलातील वन्यजिवांचे संवर्धन होईल का, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

बॉक्स

नागपूरला बैठक

महेंद्री अभयारण्याला विरोध झाल्याने शासनाने हे समृद्ध जंगल संरक्षित वन घोषित केले. याबाबत शासनाने प्रस्ताव मागविला होता. याबाबत १३ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे बैठक होती. यामध्ये संरक्षित वनाबाबतच्या तरतुदी, अटी-शर्तीनुसार प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे वरूड परिक्षेत्राचे वनाधिकारी प्रशांत लांबाडे यांनी सांगितले.