नवनीत राणा ढोंगी : शिवसेनेची पोस्टरबाजी
धारणी : खासदार नवनीत राणा या प्रसिद्धीकरिता प्रत्येक दिवसाला नवनवीन नाटक करून जनतेसमोर ढोंग करतात. त्यांच्या ढोंगाला भारतीय जनता पक्षाचे दलाल समर्थन करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. कुठे गेले तुमचे हिंदुत्व, असा प्रश्न भाजपला विचारून धारणी शहरात ठिकठिकाणी ‘ढोंगी नवनीत राणा’ अशी पोस्टरबाजीच शिवसेनेकडून शहरात करण्यात आली आहे.
खासदार नवणीत राणा यांणी २२ मार्च रोजी खासदार अरविंद सावंत यानी धमकी दिल्याचा खोटा आरोप केला. त्यांनतर २६ मार्च रोजी दीपाली चव्हाण यांना मदत न करू शकल्याबाबत रडण्याचे नाटक त्यांनी केले. ते नाटकच होते. कारण त्यानंतर लगेच २८ मार्चला कोरोना नियमाचे उल्लंघन करून मीडियासमोर नाचण्याचा आनंद लुटला. २८ मार्च रोजी आदिवासी बांधवांच्या पवित्र होळीला चपलांचा हार घालून हिंदू समाजबांधवांच्या भावना दुखावून सर्वांचा अपमान केला. अशा नाटकबाज आणि ढोंगी खासदार नवनीत राणा यांना भाजपचे दलाल समर्थन करतात, असा आरोप करणारे पोस्टर शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, सुनील चौथमल, दयाराम सोनी, राजू मालवीय, दिनेश धनेवार यांनी लावले आहे.