दुर्लक्ष : मुलींच्या आत्मसंरक्षण धडयाचा पडला विसरअमरावती : महिला आणि मुलीवरील अत्याचार रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. मात्र जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभागाने कराटे प्रशिक्षणाचा प्रस्तावच गुंडाळल्याची माहिती आहे. त्यामुळे मुलींचे नेमके कराटे प्रशिक्षण गेले कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. मुलींना आत्मनिर्भर करायचे, असे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने ठरविले होते. त्यानुसार प्रक्रियासुध्दा झाली. मात्र काही दिवसांतच हे प्रशिक्षणच गायब झाले. निधीचीही तरतूद राखीव ठेवण्याचे नियोजन केले होते. त्यावर महिला व बालकल्याण समितीत चर्चा ही झाली. परंतु हा प्रस्ताव कुठे बारगळला याचा पाठपुरावा कोणत्याही सदस्यांने केलेला नाही. दिल्लीतील निर्भया अत्याचार आणि खून प्रकरणानंतर मुलींना आत्म संरक्षणाचे धडे देण्यासाठी ही संकल्पना लावून धरण्यात आली होती. दिल्लीतील निर्भया अत्याचार प्रकरणानंतर ही संकल्पना सदस्यांनी मांडली होती. यासाठी कराटे संस्थाकडून जिल्हा परिषदेने प्रस्तावही मागविला. परंतु याला प्रतिसाद मिळाला किंवा प्रस्तावच आले नाहीत परिणामी कराटे प्रशिक्षणाचा प्रस्तावच पूर्णपणे बारगळा आहे. (प्रतिनिधी)दुर्लक्षामुळे प्रस्ताव बाळगळलाइच्छूक मुलींना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा परिषदेच्या सभेत मांडला होता. यासाठी दरम्यानच्या कालावधीत प्रशासकीय तयारी सुरु झाली परंतू चर्चेवरच हा पस्ताव प्रस्ताव बाळगळल्याचे चित्र आहे.महिला व बालकल्याण विभागाने मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यासाठी मागील दिड वर्षात राबविला नाही. मात्र त्यापूर्वी कराटे प्रशिक्षण यासंदर्भात माहिती नाही त्यामुळे नेमके याबाबत सांगता येणार नाही. मात्र यासंदर्भात उपक्रम राबविण्याबाबत विचार करता येईल- कै लास घोडके,डेप्युटी सीईओ महिला व बालकल्याण विभाग
मुलींचे कराटे प्रशिक्षण गेले कुठे ?
By admin | Updated: August 1, 2016 00:02 IST